Home गडचिरोली चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात येणार नदीलगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा

चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात येणार नदीलगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा

 

गडचिरोली / जिल्हा संपादक प्रशांत शहा

वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज, ता. चामोर्शी जि.गडचिरोली येथील मा. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग नागपूर यांनी मंजूर केलेल्या व्दार संचलन कार्यक्रमानुसार बॅरेजचे 15.00 मीटर लांबीचे व 9.00 मी. उंचीचे 38 पोलादी दरवाजे बंद करुन पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे.

दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून सर्व दरवाजे व्दार संचलन कार्यक्रमानुसार ( प्रथम नदी काठावरील व क्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे) क्रमा क्रमाने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदी पात्रात उर्ध्व बाजूस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे आणि नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. वाढलेल्या पाणीसाठयामुळे जिवीत व वित्त हानी होवू नये म्हणून, सर्व लगतचे गावांना /ग्रामपंचायतींना सुचना देण्यात येते की, त्यांनी आपले गावकऱ्यांना, याबाबत दवंडी द्वारे सुचित करावे व नदी काठावर जाणे टाळण्याच्या तसेच नदीकाठावरिल शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात. या कार्यालयाकडून ज्या शेतांचे भुसंपादन / सरळ खरेदी करण्यात आलेली आहे व येत आहे. त्या सर्व भुधारकांनी शेतातील कामे करतांना खबरदारी घ्यावी किंवा या कार्यालयाने बुडीत क्षेत्रासाठी संपादीत केलेल्या शेतांमध्ये शेतींची कोणतीही कामे करु नयेत. सर्व मासेमारी करणारे व पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये. रेती घाटातून रेती काढणारे आणि नदी पात्रात इतर काम करणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी. अन्यथ: होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. असे उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी कळविले आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

गडचिरोली पोलीस विभागाकडून परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना जाहीर

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार १९ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे....

गडचिरोली जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) प्रतिनिधी / गडचिरोली : सध्या कोव्हिड-१९ चे रुग्ण जिल्हयात वाढत असल्याने सदर साथरोगावर प्रादुर्भाव व रोखयाम नियंत्रित करण्यास्तव सर्व शासकीय /...

गडचिरोली जिल्ह्यात आज ०३ नव्या कोरोना बधितांची नोंद तर ०३ जण कोरोना मुक्त

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 437 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 03 असून कोरोनामुक्ताची संख्या 03 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चंद्रपुर श्रमिक पत्रकार भवन में डिजिटल कार्यशाला |

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर: डिजिटल मीडिया का प्रसार प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के लिए एक बड़ी चुनौती है। डिजिटल मीडिया वास्तव में क्या...

खेलो इंडिया : क्रीडा सुविधांची माहिती ३० जूनपर्यंत मागविली

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: केंद्र शासनाने " खेलो इंडिया " पोर्टल कार्यान्वीत केले आहे.जिल्ह्यातील विविध शासकीय/खाजगी शाळा, महाविद्यालय,संस्था,तसेच संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्रीडा...

शेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका… 80 ते 100 मीमी. पाऊस पडल्यावरच पेरणी करा… कृषी विभागाचे आवाहन

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: यंदाच्या खरीप हंगामात 13 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 16 जूनपर्यंत वाशिम तालुक्यातील राजगाव महसुल मंडळात 78.9 मिमी, वारला...

पीसीपीएनडीटी कार्यक्रम: खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) या कार्यक्रमांतर्गत १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाशीम येथील डॉ.सारसकर...

Recent Comments

Don`t copy text!