24 तासात 166 कोरोना बाधित रूग्ण

0
250
Advertisements

 

2 कोरोना बाधीताचा मृत्यू

चंद्रपूर प्रतिनिधी/ कैलास दुर्योधन

Advertisements

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव दिवसोनदिवस वाढत आहे .गेल्या 24 तासात 166 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 हजार 472 झाली आहे. यापैकी 8 हजार 99 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 194कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24तासामध्ये दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये, छोटा नागपूर, चंद्रपुर येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 6 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, दुसरा मृत्यू सिंधी कॉलनी परिसर रामनगर, चंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तर, दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. दोनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

 

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here