Homeचंद्रपूरगोंडपिंपरीनूसतीच " पोटदूखी "

नूसतीच ” पोटदूखी “

गोंडपिपरी / शेखर बोनगिरवार

गोंडपिपरीतील राजकारणात सध्या अनेक बदल घडतांना दिसत आहेत.राष्ट्रवादीचे सूरज माडूरवार यांनी राष्ट्रवादी सोडली अन गोंडपिपरी यंग ब्रिगेटची स्थापना केली. स्थापनेपासूनच यंग ब्रिग्रेटची चर्चा तालुक्यात आहे.तालुक्यातील तरूणांचा ओढा यंग ब्रिग्रेटकडे वाढल्याने प्रस्थापित राजकारणांची पोटदूखी वाढली आहे. सूरज माडूरवार याचा सबंधी नको त्या अफवा पसरविण्याचे कारस्थान करणाऱ्यात स्पर्धा वाढली आहे.गोंडपिपरीचा राजकारणासाठी हे नक्कीच भल्याचे नाही.

गोंडपिपरी तालुक्यातील फार कमी असे राजकारणी आहेत ज्यांचा जणमांणसावर प्रभाव आहे.यातील एक नाव आहे सूरज माडूरवार. तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी सतत झटणारे हे व्यक्तीमत्व. तालुक्यात राष्ट्रवादीची धूरा प्रभावीपणे सांभाळणार्या माडूरवार यांनी राष्ट्रवादी सोडली. मात्र जनसामाण्यांशी नाळ जूडलेला हा नेता स्वस्त बसला नाही.त्याने गोंडपिपरी यंग ब्रिग्रेटची स्थापना केली.अल्पकाळातच ही संघटना लोकप्रिय झाली आहे.तालुक्यातील तरूणांचा ओढा यंग ब्रिग्रेटकडे वाढला आहे.हे अनेकांसाठी पोटदूखीचे कारण ठरले आहे. राजकारणात सर्वाधिक स्पर्धा बघायला मिळते.एकमेकांचे पाय ओढण्यात सारेच गुंतले असतात. स्वताला सिध्द करतांनाच प्रतिस्पर्ध्याला खाली खेचण्याचे अथवा त्याची प्रतिमा मलिन करण्याचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडले जाते. यात व्यक्तीगत व्देश पार कमी बघायला मिळतो.ही केवळ राजकीय स्पर्धा असते. मात्र हल्ली राजकारणातील गणितेच बदलली आहेत. कुरघोडीचे प्रकार वाढले आहेत. या कुरघोडीतून शेणफेक करण्याचे प्रकारही वाढले आहेत. सूरज माडूरवार यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सध्या त्यांचावर व्यक्तीगत स्तरावरील टिका केली जात आहे.हे शुध्द राजकारणासाठी घातक असा प्रकार आहे.

सूरज माडूरवार असो वा इत्तर कुणी राजकारणी. राजकारणासाठी का असोना ते तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी झटतात. प्रत्येकाची वैचारिकता वेगळी असते.प्रत्येकाची विचारधारणा वेगळी असेल अथवा राजकीय विचारसरणी वेगवेगळी असेलही मात्र तालुक्याचा प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.मतभेद विसरून तालुक्याचा विकासासाठी ” हम सब ऐक है ” चा नारा देण्याची हीच खरी वेळ आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!