घरकुलासाठी राहते घर पाडले ; निधी  थकली ; आता राहतात झोपडीत

0
243

धाबा / अरूण बोरकर

Advertisements

घरकुल बांधकामासाठी अनेकांनी राहते घर पाडले. सूरवातीला विस हजार रूपयाचा निधी प्राप्त झाला.त्यानंतर मात्र निधीच मिळाला नाही. राहते घर गेले अन बांधकामही अडले.अश्या स्थितीत अनेकांनी तात्पुरती झोपडी उभारली अन त्यात संसार मांडला. अखा पावसाळा झोपडीत काढला. निधीची आस लावून बसलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांची वाताहत सूरू आहे.

Advertisements

रमाई आवास योजनेतून गोंडपिपरी तालुक्यात सन 2018-19 मध्ये 523 घरकुल मंजूर झालीत. घरकुलाचा लाभ मिळालेल्या 523 लाभार्थ्यापैकी अनेक लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम करण्यासाठी राहते घर पाडले. त्या जागेवर नविन घर बांधकामाला सूरवात केली.रमाई आवास योजनेचा विस हजार रूपयाचा पहीला हप्ता लाभार्थ्यांना प्राप्त झाला. या विस हजार रूपयात जवळची रक्कम टाकून घर बांधकाम सूरू केले मात्र त्यानंतर निधीच प्राप्त झाली नाही. 523 पैकी आजघडीला 425 घरे अर्धवट स्थितीत उभे आहेत. निधी नसल्याने बांधकाम अडले.जवळचा पैसाही संपला त्यात राहते घरही गेले.अश्या बिकट अवस्थेत अनेकांनी इत्तरांचा जागेवर तात्पुरती झोपडी उभी केली. या झोपडीत अखा पावसाळा त्यांनी काढला.गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथिल दयाशंकर ऋषी झाडे यांना स्वतची जागा नसल्याने घराजवळ असलेल्या जागेवर त्यांनी झोपडी उभी केली. आनंद रमेश कुकूडकार यांची अवस्थाही सारखीच.पंचायत समिती गोंडपिपरी येथे वारंवार घरकुल लाभार्थी चकरा मारीत आहेत.” साहेब,निधि आली का ? ” हा त्यांचा नेहमीचा प्रश्न.या प्रश्नाचे अधिकार्यांचे उत्तरही ठरलेले.” सध्या निधी नाही मात्र पुढील महीण्यात येणार “. शेकडो लाभार्थी निधीची आस लावून बसले आहेत. कोरोनाचा संकटात हातांना रोजगार नाही त्यात राहायला हक्काचे घरही नसल्याने घरकुल लाभार्थ्यांची वाताहत होत आहे.

जूनीच घरे अडली,त्यात नविन 708 घरांना मंजूरी

निधी प्राप्त न झाल्याने सन 2018-19 मधील 425 घरे अर्धवट स्थितीत उभी आहे.अश्यात सन 2019-20 या वर्षात 708 नविन घरकूल मंजूर झाली आहेत.या 708 लाभार्थ्यांना अद्याप निधी मिळालेला नाही.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here