तांत्रिक अडचणीमुळे गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना बसला फटका

0
232

गडचिरोली प्रतिनिधी/सतिश कुसराम

शैक्षणिक वर्ष २०१९ -२० मधील पदवी पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षाच्या व अंतिम वर्षातील बॅकलॉग विषय असलेल्या विद्यार्थ्याची परीक्षा आज ५ आॅक्टोबर पासून सकाळी ९ वाजता नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार होती.विद्यापीठात निर्माण झालेल्या इंटरनेट च्या तांत्रिक अडचणीमुळे ऐनवेळी सकाळ चा पेपर दुपारी २ वाजता घेण्यात येणार असल्याची सूचना विद्यापीठाद्वारे देण्यात आली मात्र तांत्रिक अडचणी दूर न झाल्यामुळे विद्यापीठाला आजचा पेपर रद्द करावा लागला.
गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत विविध अभ्यासक्रमातील अंतिम वर्षातील १८ हजार ५०० विद्यार्थी ऑनलाईन तर ७५० विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला बसले आहेत.मात्र आज ५ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ९ वाजता होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी तयार असताना सर्वर डाऊन असल्याने विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यामुळे एेन वेळी विद्यापीठाने पत्रक काढून सदर पेपर दुपारी दोन वाजता घेण्यात येत असल्याचे विद्यार्थी व संबंधित महाविद्यालयाला कळविले होते.त्यानुसार आज दोन वाजता विद्यार्थी पेपर देण्याच्या तयारीत असताना परत तांत्रिक अडचण आल्यामुळे विद्यार्थी आजचा पेपर देऊ शकले नाहीत त्यामुळे विद्यापीठ परत पत्र काढून आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सूचनापत्रा द्वारे कळवले.ऑनलाईन परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here