गडचीरोली जिल्ह्यात आज नवीन 89 कोरोना बाधित तर 73 जण कोरानामुक्त

472

 

कोरोनामूक्त रुग्णांनी 2000 चा टप्पा ओलंडला

गडचिरोली प्रतिनिधी/ सतिश कुसराम

*गडचिरोली,(जिमाका), दि.01*: आज जिल्ह्यात नवीन 89 जण कोरोना बाधित आढळले. तर एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 73 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 854 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2907 रूग्णांपैकी 2032 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

*नवीन 89 कोरोना बाधितामध्ये* : गडचिरोली येथील 45 जणांचा समावेश आहे. अहेरी येथील 5, आरमोरी येथील 10, चामोर्शी 2, कोरची येथील 1, कुरखेडा येथील 3, वडसा येथील 14, एटापल्ली येथील 4, धानोरा येथील 3, सिरोंचा येथील 2, असे एकूण 89 जण कोरेानाबाधीत आढळून आले आहेत.

*आज 73 जण कोरोनामुक्त* : यामध्ये गडचिरोलीमधील 32, अहेरी 11, आरमोरी 9, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 2, मुलचेरा 1, सिरोंचा 2, कोरची 6, कुरखेडा 4, वडसा 3, एटापल्ली 1, असे एकूण 73 जणांचा समावेश आहे.

आज नवीन 89 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 45 जणांमध्ये- आशिर्वाद नगर येथील 2, बजाज नगर 3, ब्रम्हपूरीवरुन दाखल 1, बसेरा कॉलनी 1, कॅम्प एरिया 1, पोलीस संकूल 5, लांजेडा 4, नगर परिषदेजवळ 1, शहरातील 2, गांधी वार्ड येथील 4, गोकुळ नगर 1, आयटीआय चौक 1, मूरखळा येथील 2, चंद्रपूरवरुन आलेला 1, नवेगाव येथील 4, पोलीस कॉलनी 1, रामपूर वार्ड येथील 3, रेड्डी गोडावून येथील 1, हनुमान नगर 1, सिंधी कॉलनी 1, सोनापूर कॉम्प्लेक्स 2, वसा 1, येवली 1, झाशी राणी नगर 1, यांचा समावेश आहे. तर अहेरी तालुक्यातील येथील 5 जणामध्ये शहरातील 2, आलापल्ली येथील 1, मरपल्ली 1, व प्राणहिता 1 असे एकूण 5 जणांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील 10 बाधितांमध्ये शहरातील 8, ब्रम्हपुरीचा 1, मोहटोला किनाला 1 असे एकूण 10 जणांचा समावेश आहे. चामोर्शीमध्ये लखमापूर बोरी 1, तळोधी 1 असा दोघांचा समावेश आहे. धानोरा 3 यामध्ये शहरातील 1, कोन्हाटोला 1, येरकड 1 असे तिघांचा समावेश आहे. तर एटापल्ली मध्ये शहरातील 4 जणांचा समावेश आहे. कोरची मधील 1 जण शहरातीलच आहे. कुरखेडा येथील 3 बाधीतांमध्ये शहरातील 1, वाडेगाव 1 व ऐरंदी 1 जणांचा समावेश आहे. सिरोंचा मधील 2 ही शहरातीलच आहेत. वडसा येथील 14 बाधितांमध्ये सीआरपीएफ 5, हनुमान वार्ड 1, कमला नगर 1, कोरेगाव 1, पंचायत समिती 1, विसोरा 2 व शहरातील 3 जणांचा समावेश आहे.