इंडिया दस्तक न्यूज, समाज समता संघाच्या कार्यालयाचे पालकमंत्री विजयभाऊ वडेटटीवार यांच्या हस्ते उद्याला उदघाटन सोहळा

633

चंद्रपूर

बहुजन कल्याणाचा ध्यास घेत विदर्भापासून तर महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील घटनांचा आढावा व सटिक विश्लेषणाचा हेतू घेत सुरू करण्यात आलेल्या इंडिया दस्तक न्यूज चॅनलने अल्पावधीतच आपलं वेगळ स्थान निर्माण केलंय.
सोबतच गेल्या पाच वर्षापासून सातत्याने समाज समता संघाच्या माध्यमातून सामजिक प्रश्नांची उकल व्हावी, शोषीत, पीडित, अडलेल्यांना मदतीचा हात देत बंधत्व जोपासण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. सामाजिक कार्य व शोषणाविरूध्दचा आवाज बुलंद करण्यासाठी दोन्ही माध्यम एका छत्राखाली यावी, हा उदात्त हेतू घेत चंद्रपूरात शुक्रवार दिनांक 2 आक्टोंबरला
या दोन्ही संयुक्त कार्यालयाचा उदघाटन सोहळा होत आहे.

राज्याचे बहूजन विकासमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते शुक्रवारला दुपारी बारा वाजता छोटेखानी सोहळा होत आहे.
यावेळी समाज समता संघाचे केंद्रिय अध्यक्ष मा. किशोर गजभीये सर,
चंद्रपूरचे आमदार मा. किशोरभाउ जोरगेवार, कांग्रेस पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. प्रकाशजी देवतळे ,राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. राजेद्रभाऊ वैद्य, .शरद पवार विचार मंचचे महाराष्ट्र उपाध्यक्ष. मा. शशिकांत जी देशकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे. सभापती ,दिनेश चोखारेजी , आदी मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन इंडिया दस्तक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा सीईओ व समाज समता संघाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे यांनी केले आहे.