Homeगडचिरोलीनागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजारचा निधी मंजूर: मदत...

नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजारचा निधी मंजूर: मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार

Advertisements

गडचिरोली जिल्ह्यासाठी २४ कोटी रुपये

Advertisements

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये ३०-३१ ऑगस्ट तसेच १ सप्टेंबर २०२० रोजी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरिस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरी,नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना विविध बाबींसाठी वाढीव दराने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून नागपूर विभागातील पूरग्रस्त जिल्ह्यासाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदीखुर्द प्रकल्पातील सर्व दरवाज्यांमधून ५ मीटर पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात १९९५ साली ओढावलेल्या पूरापेक्षाही मोठ्या प्रमाणात पूर पपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांत, शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या अनुषंगाने आजच महसूल व वन विभागाने निधी मंजूरीचा शासन निर्णय निर्गमीत केला.

नागपूर विभागातील ६ जिल्हयातील मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज शेतीसाठी सहाय्य व मदत, मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णता: घराची क्षती झाली असल्यास कपडे, भांडी व घरगुती वस्तूंकरीता, शेतपिकांच्या नुकसान, मृत जनावर, व घराची अंशता: पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरं, नष्ट झालेल्या झोपड्या आणि गोठ्याचे नुकसान, कारागीर, बारबलुतेदार, दुकानदार व टपरी धारकांना मदत, जमिनीतील वाळू, चिकन माती क्षार काढून टाकण्यासाठी शेतकर्याना सहाय्य तसेच नदीच्या रूपांतरामुळे झालेले जमिनीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सहाय्य, मोफत केरोसीन वाटपासाठी साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १६२ कोटी ८१ लाख ७ हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्हयासाठी २ हजार ४३७ लाख २९ हजार रूपये निधी मंजूर झाला आहे.

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!