Homeगडचिरोलीगडचीरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह जिल्ह्यात आज नवीन 107 कोरोना बाधित तर 26...

गडचीरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह जिल्ह्यात आज नवीन 107 कोरोना बाधित तर 26 जण कोरानामुक्त

 

गडचिरोली प्रतिनिधी/सतिश कुसराम

वडसा येथील गांधी वार्ड मधील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याची नोंद आज जिल्हयात झाली. तसेच नवीन 107 जण कोरोना बाधित आढळले. तर एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 26 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 838 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2818 रूग्णांपैकी 1959 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू कोरोनामूळे झाला आहे.

*नवीन 107 कोरोना बाधितामध्ये* : गडचिरोली येथील 34 जणांचा समावेश आहे. अहेरी येथील 9, आरमोरी येथील 7, चामोर्शी 7, कोरची येथील 3, कुरखेडा येथील 2, वडसा येथील 7, मुलचेरा येथील 2, एटापल्ली येथील 22, धानोरा येथील 12, भामरागड येथील 2 असे एकूण 107 जण कोरेानाबाधीत आढळून आले आहेत.

नवीन बाधितांमध्ये अहेरी येथील 9 मध्ये शहरातील 7 तर महागावचे 2 जण आहेत. आरमोरीचे 7 यामध्ये शहरातील 3, थानेगाव 2 व वैरागडचे 2 जण आहेत. भामरागड शहरातील 2 जण बाधित आढळून आले आहेत. चामोर्शी 7 मध्ये आष्टी 2, शहर 3, येनापूर 1 व तळोधी 1 चा समावेश आहे. धानोरा 12 मध्ये शहर 2, मुरूमगाव 1 व 9 जण पोलीस स्टेशन गोदलवाहीचे आहेत. एटापल्ली मधील 22 मध्ये 15 शहरातील सीआरपीएफ आहेत व हेडरीचे ७ जण आहेत.

गडचिरोली 34 मध्ये कन्नमवार वार्ड 2, आर्शिवाद नगर 1, खरपुंडी 1, सीआरपीएफ एमआयडीसी 1, आयोध्यानगर 2, कॅम्प एरिया 3, नवेगाव 5, गोकुळनगर 1, आयटीआय चौक 2, जेप्रा 1, कोटगल 1, लांजेडा 1, माडेतुकूम 1, मुरखळा 1, विद्या भारती शाळेजवळ 1, वियानी शाळेजवळ 1, पंचवटी नगर 1, आमिर्झा 1, पोटेगाव रोड फॉरेस्ट कॉलनी 1, रामपूरी वार्ड 1, स्नेहा नगर, सोनापूर कॉम्प्लेक्स 1, एसटी डेपोजवळ 1, एसटी संकुल 1 यांचा समावेश आहे. कोरची मधील 3 मध्ये बोरी 1, गुटेकसा 1 व शहरातील 1 जण, कुरखेडा मधील 2 अंगारा व शहरातील बाधित आहेत.

मुलचेरा 2 जण शहरातील आहेत. वडसा 7 मध्ये सीआरपीएफ 2, गांधी वार्ड 1, कुरूड 1, माता मंदिर 1 व पोलीस स्टेशन जवळील 1 जणाचा समावेश आहे.

*आज 26 जण कोरोनामुक्त* : यामध्ये गडचिरोलीमधील 17, अहेरी 2, आरमोरी 1, भामरागड 1, चामोर्शी 2, सिरोंचा 1, वडसा 2, असे एकूण 26 जणांचा समावेश आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!