Homeगडचिरोलीचांदागडातील बौध्द संस्कृतीचे दुसरे मोठे केंद्र " मुलचेरा "

चांदागडातील बौध्द संस्कृतीचे दुसरे मोठे केंद्र ” मुलचेरा “

संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे.

चंद्रपूर व ब्रम्हपुरी मधील जमिनदारी व मालमत्तेचे हस्तांतरण करून गडचिरोली तहसील म्हणून १९०५ पासून अस्तित्वात होती. ब्रम्हपुरी ऐवजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हाच्या मानाने गडचीरोली जिल्हा आजही मागासलेला आहे. गडचीरोलीच्या भुभागावर निसर्गाने मुक्त उधळन केली. अनेक निसर्गरम्य स्थळे येथे आहे.
विपुल वनसंपदा,खनिज संपती जिल्हाच्या भुगावर आहे. गडचीरोली जिल्ह्यात होणाऱ्या नक्षल कार्यवाहीमुळे या जिल्हाचे नाव माध्यमात सतत झळकत असते. येथिल आदीवासी बांधवानी आपल्या प्राचीन संस्कृतीचे जतन करून ठेवले आहे. गडचीरोली जिल्हाचा प्राचीन इतिहासही मोठा आहे. मौर्य,सातवाहन,वाकाटक,राष्ट्रकुट,चालुक्य,नाग आणि गोंड राजांची येथे सत्ता होती. मात्र जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक स्थळे अशी आहेत ज्यांच्यावर अद्यापही प्रकाश टाकला गेलेला नाही.मुंबई,पुणे,नागपूरचा संशोधकांनी येथे संशोधन करण्याचे टाळले. माध्यमातून येणाऱ्या नक्षल कार्यवाहीच्या बातम्यानी नुसत्या गडचीरोलीच्या नावानेही अनेकांच्या मनात भितीचे अंकुर फुटते.वास्तविकता मात्र त्याहून भिन्न आहे.येथिल माणसे मनमिळावू असून आदर,सन्मान करणारी आहेत. जिल्ह्यातील अनेक गावे आता कात टाकू लागली आहे.मागासलेपणाची धूळ आता गावे झटकू लागली आहेत.अनेक गावात सोईसूविधा आता आपल्या दिसतील.


बौध्द संस्कृतीचे केंद्र…

आज मागासलेपणाची चादर ओढून बसलेल्या गडचीरोली जिल्हाचा भुभाग बौध्द संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. जिल्ह्यातील काही भागात सम्राट अशोक,सातवाहन,वाकाटक आणि चेरकालीन अवशेष सापडले आहेत. या भागातून बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. येथे त्याकाळी बौध्द स्तूप उभारली गेली होती. बौध्द भिक्षु आणि बौध्द उपासकांची येथे रेलचेल होती.येथिल गावात,वनात आणि घराघरातून ” बुध्दम शरणम गच्छामी ” चा आवाज ऐकू येत होता. गडचीरोली जिल्ह्यात येणारे मुलचेरा हे प्राचीन काळात बौध्द संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र बनले होते.


मुलचेरा या नावात दोन शब्द आढळतात.मुल +चेरा. या दोन्ही शब्दाचा अर्थ भिन्न आहे.मुल म्हणजे मुळ,मुख्य असा अर्थ होतो.दूसरा शब्द आहे ” चेरा ” या शब्दातून प्राचीन इतिहासातील एका राजघराण्याची ओळख होते. प्राचीन काळापासून द्रविड लोकांचे विभाजन चेर,चोल आणि पांड्य या तीन घराण्यामध्ये झाले होते. ” चेर ” नावाने ओळखल्या जाणाऱ्या द्रविड लोकांनी दिना नदीचा खोर्यात वस्ती केली. त्या वस्तीला नाव दिले ” मुळचेरा “. कालांतराने मुळचेराचे मुलचेरा हे नाव पडले. द्रविड कोण होते ? याबाबत the untouchables या ग्रंथात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ” दक्षिण भारतातील द्रविड लोक व उत्तर भारतातील नाग किवा असूर लोक हे एकाच वंशाचे आहेत. ( पृष्ठ क्र.62 ) याचा अर्थ असा कि चेर लोक हे नागवंशीय होते. आणि नाग बौध्द धम्माचे उपासक होते.त्यामुळे चेर लोकांनी मुलचेर्यात बुध्द स्तूपाची निर्मिती केली आणि बुध्द धम्माचा प्रचार,प्रसार केला होता.

काय सापडले मुलचेर्यात…

मुलचेरा येथे प्राचीन तलाव आहे.या तलावाचा दक्षिण बाजूचा पाळीला लागुन गोलाकार टेकड होते. या टेकडाचा दोन्ही बाजूनी चिंचेची दोन झाडे होती. वादळ वार्यात ही झाडे कोसळलीत.झाड कोसळल्यामुळं टेकडाचा आत असलेल्या विटांचे बांधकाम बाहेर पडले.आणि भुगर्भात दडलेला इतिहास बाहेर आला.ते नुसतेच टेकड नव्हते ,ते होते बौध्द स्तूप.
सम्राट अशोक,सातवाहन आणि वाकाटक काळापर्यंत विटांचे बांधकाम असलेल्या बौध्दस्तूपाची निर्मिती केल्या गेली.काळाचा ओघात असे हजारो स्तूप माती खाली गाडल्या गेलीत. त्यातील अनेक स्तूप अभ्यासकांनी शोधली तर स्तूप आजही अभ्यासकांचा प्रतिक्षेत आहेत.

” धन्नामोरे ” स्तूप…

मुलचेरा या गावाचा दक्षिणेकडे अंदाजे दोन कि.मी.अंतरावर एका शेतात मातीचं टेकड होतं. शेतात नागंरणी करतांना येथून प्राचीन विटा बाहेर येत होत्या.गोलाकार बांधकाम आणि विटांचा आकारावरून त्या विटा स्तूपाचा होत्या हे स्पष्ट झालं होत. आता प्रतिक्षा होती उत्खननाची.

गोपीचंद कांबळे यांची कामगिरी

यवतमाळ येथिल प्रसिध्द इतिहास अभ्यासक गोपीचंद कांबळे ” विध्यार्थी ” हे 1988 मध्ये मुलचेरा वनविभागात वनपाल पदावर कार्यरत होते. ते एक चांगले बौध्द उपासक होतेच सोबतच इतिहासाची त्यांना आवड होती. आज त्यांच्या नावावर अनेक पुस्तके आहेत मात्र त्यावेळी त्यांचा अभ्यास भरीव नव्हता. मुलचेर्यात सापडणार्या प्राचीन विटा कश्याचा असतील ? याची उत्सूकता त्यांना लागली होती. ही उत्सूकता त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. या उत्सूकतेने चांदागडातील प्रकाशमय इतिहास जगासमोर येणार होता.


क्रमशः

निलेश झाडे मो.8805375549

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!