Homeगडचिरोलीमिठाई, दुग्धजन्य पदार्थाच्या ट्रे समोर "बेस्ट बिफोर" लिहणे बंधनकारक

मिठाई, दुग्धजन्य पदार्थाच्या ट्रे समोर “बेस्ट बिफोर” लिहणे बंधनकारक

 

गडचिरोली प्रतिनिधी/सतिश कुसराम

*गडचिरोली,(जिमाका) दि.30*: सर्व मिठाई उत्पादक, विक्रेते यांनी बर्फी, मिठाई व दुग्धजन्य पदार्थाच्या खुल्या विक्रीसाठी साठविलेल्या ट्रे वर बेस्ट बिफोर ठळक अक्षरात लिहणे दि.01 ऑक्टोबर 2020 पासून अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकारी, नवी दिल्ली यांनी बंधनकारक केले आहे. याची अंमलबजावणी दि.01 ऑक्टोबर 2020 पासून महाराष्ट्र राज्यात अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे.

प्रत्येक खुल्या मिठाईच्या ट्रे वर बेस्ट बिफोर दिनांक टाकल्याने ग्राहकांना ती मिठाई किती दिवस पर्यत खाण्या योग्य राहते याची कल्पना येईल व त्यामुळे अन्न विषबाधे सारखी अप्रीय घटना टाळता येवू शकेल. तरी सर्व मिठाई विक्रेत्यांनी वरील नमुद तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा त्यांचे विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत कारवाई घेण्यात येईल यांची नोंद घ्यावी असे अ.प्र. देशपांडे सहायक आयुक्त (अन्न), गडचिरोली यांनी कळविले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!