विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खात्यात

351

 

गडचिरोली प्रतिनिधी/सतिश कुसराम

*गडचिरोली (जिमाका) दि.30*: महाराष्ट्रात जवळपास ३.७० लाख आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ३००० विद्यार्थ्यांची Post Matric scholarship (दहावीनंतर) आधार सीडेड बँक खाते नसल्याने त्यांच्या सध्याच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यावर मार्ग काढत अशा विद्यार्थ्याची आवश्यक अशी सर्व माहिती इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेला सादर केली आहे, जेणेकरून अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये/आपल्या पोस्टमनकडे आधार सीडेड इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचे खाते काढता येईल. विद्यार्थ्याला मिळणारी शिष्यवृत्ती हि DBT स्वरुपात मिळत असल्याने आधार सीडेड बँक खाते असणे अतिशय आवश्यक आहे.

खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक, मोबईल व स्कॉलरशिपसाठी अर्ज करतांना आलेला १७ अंकी APLLICATION NUMBER (उदा. 1920xxxxxxxxx2292) घेऊन आपल्या गावातील पोस्ट ऑफिस/पोस्टमन/मुख्य डाक घर गडचिरोली कडे जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे आधार सीडेड बँक खाते काढून घ्यावे असे आवाहन डाकघर अधीक्षक श्री. अशोक सुशीर यांनी केले आहे.

जिल्यातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये ही सुविधा उपलब्ध असेल, तसेच त्यासाठीची मोहीम सुरु झाली असून विद्यार्थ्यांना SMS द्वारे ह्याची माहिती कळविण्यात आलेली आहे.

देशभरात तसेच गडचिरोली जिल्ह्यात २०१८ पासून इंडिया पोस्ट पेमेंट्स सुरु झाली असून या बँकेद्वारे स्कॉलरशिप खात्यासह प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, मनरेगा, विविध पेन्शन योजना, प्रधानमंत्री कृषी सम्मान योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना व अन्य सरकारी DBT योजनांचा लाभ ग्राहकांना घेता येत असल्याची माहिती आकाश मा. वाहने शाखा व्यवस्थापक इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, गडचिरोली यांनी दिली आहे.