Homeगडचिरोलीआष्टी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अनेक गावांत एका फोन वर होते दारू...

आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अनेक गावांत एका फोन वर होते दारू उपलब्ध

जैरामपूर,मुधोली,गणपूर बनत आहे अवैद्य दारू विक्रीचा अड्डा

पोलिस विभाग घेत आहे झोपेचे सोंग

चामोर्शी प्रतिनिधी/नेमाजी घोगरे

गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी आहे. परंतु आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अनेक गावांत व आष्टीत ठिकठिकाणी ” एका फोन वर दारू आली असे चित्र आहे ”आष्टी शहरात व परिसरातील अनेक गावांत गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री केली जात आहे.आष्टीला चंद्रपूर जिल्ह्याची सीमा लागून आहे.तेलंगणा राज्याची सिमा गोंडपिपरी लागून असल्यामुळे तिकडून शहरात दारू येत असेल अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.मोठ्या प्रमाणात बनावट दारू सुद्धा दिसत आहे. तरी मात्र प्रशासनाकडून पोलीस विभागाकडून झोपेचे सोंग घेतल्याची भूमिका घेतली जात असल्यामुळे अवैध रित्या दारू विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र मुधोली,जैरामपूर परिसरात आहे. प्रशासन मात्र थातुरमातुर कारवाई करून आपण केलेली कारवाई योग्य असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्याना भासवून येथील अट्टल दारू विक्रेत्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मद्यपी आपली हौस भागवण्यासाठी ठरवून दिलेल्या किंमती पेक्षा दुप्पट पैसे देऊन दारू विकत घेत आहेत. अश्यातच दारू विक्रेता दुप्पट नफा कमावित असल्याने नीट उभा होत असलेला सुखी संसाराचा डोलारा पुन्हा कोसळायला सुरुवात होणार काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!