Advertisements
धाबा / अरूण बोरकर
Advertisements
भविष्यातील राज्य मार्ग म्हणून बघीतल्या जाणाऱ्या गोंडपिपरी-धाबा मार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. मार्गात शेकडो खड्डे पडले असून अनेक ठिकाणी मार्ग पुर्णताहा उखळला आहे.परिणामी या मार्गावर लहान-मोठे अपघात अधूनमधून घडत असतात.या मार्गाचा बांधकामाला मंजूरी मिळाली आहे.मात्र अद्यापही बांधकामाला सूरवात झालेली नाही.या मार्गातील खड्यात गिट्टी टाकून मार्गाची मलमपट्टी केली जात आहे.दरम्यान मार्गाचे बांधकाम त्वरित सूरू करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Advertisements
Advertisements