अखेर गोंडवाना विद्यापीठाला मिळाली 12 बी ची मान्यता

1326

 

गडचीरोली प्रतिनिधी/ नितेश खडसे

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीसाठी विद्यापीठाला 12 (बी) चे निकष पूर्ण करावे लागतात. ते नसेल, तर विकासाची गती मंदावते, 12(बी) नसल्यामुळेच गोंडवाना विद्यापीठाला मागिल 9 वर्षात पाहिजे तशी प्रगती करता आली नव्हती. मात्र, आज बुधवार, 23 सप्टेंबर रोजी या विद्यापीठाला 12 (बी)चा दर्जा प्राप्त झाला. तसे पत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांना युजीसीने पाठवले आहे. यामुळे विद्यापीठ वर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे.
आगामी वर्धापन दिनापर्यंत म्हणजे, 2 ऑक्टोबपर्यंत 12 (बी) गोंडवाना विद्यापीठाला जाहीर होण्याची शक्यता  होती. गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी 12 (ब) प्राप्त व्हावे म्हणून विद्यापीठाचे सिनेट सदस्य, पदाधिकारी व आजी-माजी कुलगुरू सातत्याने प्रयत्नरत होते. अखेर ही सुखद बातमी विद्यापीठाला प्राप्त झाली असून, त्यात युजीसीने काही सुचनाही केेल्या आहेत. विद्यापीठाने लवकरात लवकर नॅक प्रमाणपत्र प्राप्त करावे तसेच आवश्यक प्राध्यापकांच्या भरत्या पूर्ण कराव्यात, अशा शिफारशींचा समावेश आहे.