Home चंद्रपूर जेष्ठ नागरिकांना वापोरायझरसह आरोग्य किटचे वाटप -आ. मुनगंटीवार यांचा पुढाकार

जेष्ठ नागरिकांना वापोरायझरसह आरोग्य किटचे वाटप -आ. मुनगंटीवार यांचा पुढाकार

कोविडग्रस्तांना वाळीत टाकू नका..विजयराव चिताडे

महानगर भाजपाचा सेवा सप्ताह

चंद्रपूर / कैलाश दुर्योधन

काळजी घेतली नाही तर,कुणाला केव्हा कोरोनाचा संसर्ग होईल सांगता येत नाही.उद्या आपणही बळी ठरू शकतो.परंतु सद्या,कोरोना झाला तर त्याच्या पूर्ण परिवाराकडे उपहासात्मक बघितले जाते.ही चिंतेची बाब आहे.त्यामुळे कोरोनामुळे होणाऱ्या कोविडग्रस्तांना वाळीत टाकू नका,असे कळकळीचे आवाहन गुरुदेव सेवा मंडळचे सदस्य विजयराव चिताडे यांनी केले.
ते आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून,भारतीय जनता पार्टी (महानगर)च्या वतीने सेवा सप्ताह निमित्य खेडुले कुणबी समाज भवन तुकुम येथे सोमवार (२१ सप्टेंबर)ला आयोजित जेष्ठ नागरिकांना आरोग्य किटचे वाटप कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे, महापौर राखिताई कांचर्लावार,भाजपा नेते प्रकाश धारणे,दत्तप्रसन्न महादाणी,नगरसेवक व जेष्ठ नागरिकांना सुरक्षा कवच वाटप प्रकल्पाचे संयोजक सुभाष कासंगोट्टूवार,जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे,नगरसेविका माया मांदाडे,माया उईके,शिला चव्हाण,जेष्ठ नागरिक रमेश कासुलकर,अशोक संगीडवार,प्रशांत विघ्नेश्वर,सूरज पेदूलवार आणि रामकुमार अकापेलिवार यांची उपस्थिती होती.
चिताडे म्हणाले,कोरोना विषयी बऱ्याच चर्चा व अफवा आहेत,त्यावर विश्वास ठेवू नका,तसेच मनातील भीती काढा,आरोग्याची काळजी घ्या.एकमेका साहाय्य करू,अवघे धरू सुपंथ..असे वागा.
या प्रसंगी डॉ गुलवाडे यांनी सुदृढ निरोगी आरोग्यासाठी महत्वपूर्ण सूचना करीत आर्सेनिक अलबम व वेपोरायझर देण्यामागचे कारण विशद केले.महापौर कांचर्लावार यांनी त्रास जाणवल्यास लगेच तपासणी करण्याच्या सूचना करीत,घाबरू नका असे आवाहन केले.या वेळी १३८ जेष्ठ नागरिकांचा आरोग्य किट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ज्यात वेपोरायझरसह आर्सेनिक अलबम,सॅनेटायझर ,मास्कचा समावेश असल्याचे प्रास्ताविकात सुभाष कासंगोट्टूवार यांनी जाहीर केले.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हे आयोजन सेवा भावनेतून होत आहे असे ते म्हणाले.याच वेळी त्यांनी कोरोना काळात आ मुनगंटीवार यांनी केलेल्या लोकोपयोगी कार्याचा आढावा घेतला.सर्व मान्यवरांचा आ मुनगंटीवार यांचे व्यक्तिमत्व अधोरेखित करणारे “विकासाचा कल्पवृक्ष”हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.दत्तप्रसन्न महादाणी यांनी कोरोना संकटातील अनुभव विशद करीत काळजी घेण्याचे आवाहन केले.प्रशांत विघ्नेश्वर यांनी आभार मानले.याच वेळी डॉ गुलवाडे यांचा वाढदिवसा प्रित्यर्थ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यशस्वीतेसाठी बबनराव धर्मपुरीवार,आशाताई दोनाडकर,मरलीधर शिरभैय्ये,लक्ष्मणराव पतरंगे,पुरुषोत्तम सहारे,प्रज्ञा बोरगमवार,मंजुश्री कासंगोट्टूवार, धर्माजी खंगार,रमेश दादगळ, बबनराव अनमूलवार,प्रभाकर भोंग,सुधाकर बोन्दे, बंडूभाऊ भाकरे,विजय ठकरे,बबनराव मत्ते,विठ्ठलराव देशमुख आणि पुरुषोत्तम राऊत यांनी परिश्रम घेतले.यावेळी चैतन्य जेष्ठ नागरिक संघ तुकुम यांचेसह किमान ११ जेष्ठ नागरिक संघाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय राहिली.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत राहणे गरजेचे – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर: मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सोबत राहुन मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासह विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करता आला. याच दरम्याण घुग्घुस नगर परिषद...

ग्रामस्थांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा करा- शिवानी वडेट्टीवार

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदार संघात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विकासात्मक दूरदृष्टी कोनातून मोठ्या...

अग्निपथ योजने विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन…

चंद्रपूर:- केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.मेहबूब भाई शेख यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले. सदर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

गोंडपिपरीत तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ… कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन…

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहचविण्याचा प्रयत्न

सिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील दोघे तेलंगणातील,...

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत राहणे गरजेचे – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर: मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सोबत राहुन मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासह विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करता आला. याच दरम्याण घुग्घुस नगर परिषद...

जन्मताच आईचे मातृत्व हरवलेल्या आदेशचे स्वतःची सायकल असण्याचे स्वप्न कर्मयोगीने केले पूर्ण…

नागपूर: १० दिवसापूर्वी संध्याकाळच्या वेळेला जवळपास ७ वाजले होते,अचानक एक कॉल आला. तो कॉल होता बिबी (सावळी ) त. हिंगणा जि. नागपूर या गावातील...

Recent Comments

Don`t copy text!