आष्टी येथील ब्रिटिशकालीन विश्रामगृह दुरवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
आष्टी प्रतिनिधी/चेतन कारेकार
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे १९२७ मध्ये ब्रिटिशांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. मागील ९० वर्षांपासून विश्रामगृह स्थित आहे.
स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विश्रामगृहाच्या देखभालीची जबाबदारी आली. काही वर्षा पूर्वी येथे मुलांना खेळायला पाळणे, बसायला गवताची सोय, रंगी बेरंगी फुलांचा बगीचा, झाडांची सावली आणि असंख्य पक्षांचा वावर नैसर्गिक अस वातावरण. परंतु आता या भागात विशेष लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांसाठी हे विश्रामगृह आधी सारखे आकर्षक राहिलेले नाही.
काही वर्षांपूर्वी येथील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची व्यवस्था सुद्धा शासणा कडून होती परंतु दुर्लक्ष करताच त्याचे कवेलू, दारे, खिडक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. विश्रामगृहासभोवताल वृक्ष-वेली वाढल्या आहेत. परिसरात कचरा उगवला आहे, विश्रामगृहातील मागील एका खोलीत पाणी सुध्दा गळत आहे, आता पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नाही.
त्यामुळे ब्रिटिश काळापासून जपलेला वारसा नष्ट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या विश्रामगृहाची दुरूस्ती व रंगरंगोटी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
*पर्यटनाला वाव:*
गडचिरोली- चंद्रपूर सीमा जोडणाऱ्या वैगंगा नदीच्या टोकावर अगदी आकर्षक ठिकाणी विश्रामगृह स्थित आहे त्यामुळे या स्थळाचा विकास केल्यास पर्यटनाला वाव मिळेल. तसेच ब्रिटिशकालीन विश्रामगृहाची दुरूस्ती झाल्यास बाहेरील पर्यटकांसाठी ही आकर्षणाचे स्थळ निर्माण होईल, पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिकांना रोजगारही मिळेल.