गोंडपिपरी तालुक्यात बिजेपी नेत्या कडून वाळू तस्करी

1777

अधिकऱ्यांये अभय

गोंडपिपरी

सद्या चंद्रपूर जिल्यात लाकडाऊन मध्ये शिथिलता आल्या मुळे विकास कामे व घर बाधंकामात गती आली आहे. व रेती घाटाचं लिलाव न झाल्या मुळे महसूल विभागात व पोलीस विभागात अनेक पद रिक्त आहेत.याचाच फायदा घेत एका भाजपाच्या नेत्याने काही पोलीस कर्मचारी व गावतील पोलीस पाटील यांना हाताशी धरून आपले राजकीय वजन वापरून हा माफिया अवध्य रेती ची खुलेआम विक्री करीत आहे.
सदर माफिया हा भाजपाचा जेष्ठ कार्यकर्ता आहे. हा कार्यकर्ता काही ट्रॅक्टर वाल्याशी संगन मत करून लिखित वाडा, तारडा या घाटाऊन जेसीबीद्वारे रात्री च्या सुमारास रेती उत्तखनन करीत आहे.रात्री पोलीस गस्त करणाऱ्या पोलीस अधिकारी यांना म्यानेज करून हा नेता 28000 हजार रुपये ट्रक तर 6000 हजार रुपये ट्रॅक्टर दराने विक्री करीत आहे.या मुळे महसूल विभागाला दररोज लाखो रुपयाचा चुना लागत आहे. त्या मुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाब लक्षात घेऊन ही रेती तस्करी थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सदर व्यक्ती हा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता असून अश्या तस्कराला पक्ष पाठीशी घालणार नाही.

बबन निकोडे
भाजपा तालुका अध्यक्ष गोंडपिपरी

( संग्रहीत छायाचीत्र )