Homeगडचिरोलीचंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांची बदली

चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांची बदली

नवे पोलिस अधीक्षक अरविंद सावळे

चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन

चंद्रपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांची बदली झाली असून त्यांचे जागेवर भंडारा येथील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे हे जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळणार आहे.
मागील महिन्यात डॉ रेड्डी यांची बदली झाल्याची सोशल मीडियावर अफवा उडाली होती परंतु ती अफवा सत्य होती त्यांची बदली कुठे झाली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
डॉ रेड्डी यांचे नंतर मेकॅनिकल इंजिनियर असलेले पोलीस अधीक्षक चंद्रपूर जिल्ह्याला लाभणार आहे.
सध्या जिल्ह्यात अवैध दारू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे, डॉ रेड्डी यांच्या कार्यकाळात पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांची दारू माफियांकडून हत्या झाली होती.
परंतु पोलीस प्रशासनाने त्यावेळी कठोर पाऊले उचलली नव्हती, काही काळानंतर पुन्हा एका दारू विक्रेत्याने पोलिसाला मारहाण केली तो आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही.
कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर आहे आता नवीन पोलीस अधीक्षक त्यामध्ये काय सुधारणा करतात ही तर येणारी वेळचं सांगेल.
नवे जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा हा अल्पसा परिचय
पोलीस अधीक्षक आहेत मेकॅनिकल इंजिनियर
मुळचे वैदर्भीय असलेले अरविंद साळवे यांचे बालपण आणि शिक्षण वडीलांच्या नोकरीमुळे औरंगाबाद शहरात झाले. औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरमधून पदवी घेतली आहे. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त झाले. त्यांची सर्वप्रथम नियुक्ती वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, देसाईगंज आणि भंडारा येथे १९९९ मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्य केले. २००८ साली अमरावतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम सांभाळल्यानंतर अमरावतीतच लाल लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक झाले. त्यानंतर नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. भंडारा येथे येण्यापूर्वी ते मुंबई येथे राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी पोलीस अधीक्षक होते. राज्यातील वीज चोरी थांबविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा झाली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!