प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथील वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार

868

गडचिरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराजी होळी यांच्या नेतृत्वाखाली बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शाहा यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी श्री,डॉ मेश्राम साहेब यांचा कोरोना योद्धा मध्ये चांगले कामगिरी केल्याबद्दल डॉ मेश्राम साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले,व नर्स,आशा यांचे सुध्दा अभिनंदन करीत प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी परिसरात वृक्षरोपण अश्या विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले.
यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सभापती रंजिता ताई कोडापे,प्रदेश सरचिटणीस प्रकाश भाऊ गेडाम, भाऊजी नेवारे, अमित चक्रवर्ती,उमेश मलिक, रवी दुधकोवरे,अमियो विश्वास,बालाजी नेवारे,आदी उपस्थित होते