दारु साठ्या सह १लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त ;ठाणेदार संदीप धोबे यांची कार्यवाही

774

गोंडपिपरी :- आकाश चौधरी

चंद्रपूर येथून गोंडपिपरी कडे दुचाकी वाहनाने दारू पुरवठा करीत असल्या बाबतची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी धाबा टी पॉईंट येथे पाळत ठेवली. मात्र दारू तस्करांनी दुचाकीं न थांबवता पळ काढल्याने त्यांचा पाठलाग करीत पोलिसांनी शहरातील जय सेवा चौक येथे दुचाकीस्वारांना पकडून 37 हजार रुपये किमतीच्या दारू साठा, दुचाकी वाहन व मोबाईल असा एकूण एक लाख 23 हजार किमतीच्या मुद्देमाल जप्त केला.

गेल्या काही दिवसांपासून गोंडपिपरी शहरात छुप्या मार्गाने दारु तस्करी सुरू होती. अशातच चंद्रपूर विसापूर (बल्लारशा) येथील काही दारू तस्कर मागील अनेक दिवसांपासून या गोरख धंद्यात सक्रिय असताना पोलिसांना चकविण्यात आजवर यशस्वी ठरले होते. मात्र आज मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर येथून दोन इसम दुचाकीने दारू आणत असल्याची माहिती मिळताच गोडपिपरी ठाणेदार संदीप धोबे , पोलीस शिपाई प्रेम चव्हाण, संजय कोंडेवार, नासिर शेख, अनिल गुरनुले यांनी स्थानिक धाबा कॉर्नरवर चंद्रपूर मार्गे येणाऱ्या दुचाकी वर पाळत ठेवली असताना एक बिना नंबरची दुचाकी अतिवेगाने येत असल्याचे पाहून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीस्वारांनी वाहन न थांबता सरळ भरधाव वेगाने निघून गेले. त्यांचा पाठलाग करताना पोलिसांनी शहरातील जय सेवा चौक येथे आडवून तपासणी केली असता 370 नग देशी दारूच्या छोट्या बॉटल आढळल्याने दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आणलेली दारू ही आशिष मुरकुटे, व नाना तंन्नीरवार यांना पुरवठा करीत असल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी चूनेश बघेल , सुनील राय दोन्ही रा. रमाबाई नगर अशभुजा वॉर्ड चंद्रपुर यांना ताब्यात घेऊन गोंडपिपरी येथील आशिष मुरकुटे , व नाना तंन्नीरवार यांचे विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करीत तब्बल एक लाख 23 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.