Homeगडचिरोलीजिल्हयातील शासकीय, खाजगी नियोक्ते उद्योजक यांनी महास्वयम वेबपोर्टलवर नोंदणी करावी

जिल्हयातील शासकीय, खाजगी नियोक्ते उद्योजक यांनी महास्वयम वेबपोर्टलवर नोंदणी करावी

Advertisements

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

Advertisements

गडचिरोली : जिल्हयातील शासकीय खाजगी नियोक्ते उद्योजक यांनी शासनाच्या महास्वयम वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही अशा नियोक्त उद्योजक यांना नोंदणी न करता त्यांचेकडे असलेल्या रिक्तपदे अधिसूचित करण्याची सुविधा असावी याबाबत सदरची अतिशय सोपी पध्दतची सुविधा विकसित करण्यात आलेली आहे.

या अनुसरुन वेबपोर्टल सुविधा विकसीत करुन महास्वयम वेबपोर्टवर Urgent Manpower या ऑप्शनमध्ये उपलब्ध केली आहे. ही सुविधा नोंदणी न केलेल्या नियोक्त/उद्योजक यांना वापरण्याबाबत अतिशय सोपी पध्दत आहे. यामधे http://rojgar.maharojgar.gov.in या वेबपोर्टलवर Urgent Manpower या मेनुवर क्लिक करावे. त्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर अनिवार्य (Mandatory Fields) माहिती उदा. कंपनीचे नांव, पत्ता, जिल्हा, मोबाईल क्रमांक व भरावयाच्या पदाची माहिती उदा. शैक्षणिक पात्रता, एकूण पदांची संख्या, पदांचे नांव, इत्यादी माहिती Vacancy Order मध्ये भरावी व सबमिट करावे. जो मोबाईल क्रमांक दिलेला असेल त्यावर OTP येईल तो सबमिट करावा, त्यानंतर नियोक्त/उद्योजक यांना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर व ई-मेल आयडीवर एक संदेश जाईल.

त्यानंतर 30 मिनिटात नियोक्त उद्योजक त्यांच्या ईमेलवर उमेदवारांची यादीच्या लिंकसाठी मेल जाईल.
सदरची सुविधेबाबतच्या अटी व शर्थी पुढील प्रमाणे असतील: 1) नियोक्त/उद्योजक सदरची सुविधा ही एकदाच वापरु शकता, 2) दुसऱ्यांदा यादी पाहिजे असल्यास त्यांना महास्वयम वेबपोर्टवर नोंदणी करावी लागेल.3) नियोक्ते/उद्योजक यांना यांनी रिक्तपद अधिसूचित करतांना दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अथवा उच्च पात्रतेच्या फक्त 20 उमेदवारांची यादी एक्सेल फॉरमॅटमध्ये मिळेल. माहितीच्या आधारे आपल्या आस्थापनावर रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही करावी. असे आवाहन प्र.वा. खंडारे, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!