अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी

0
407

 

प्रतिनिधी / रमेश कोरचा

गडचिरोली:
कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथे आज झालेल्या अस्वलाच्या हल्लात मालदुगी येथील यादवराव राऊत वय वर्ष 47 हे इसम जखमी झाले आहेत. जंगलात मोठ्या प्रमाणात मशरूम(टेकोडे)फुटल्याने ते गोळा करण्यासाठी यादवराव राऊत पहाटेच्या सुमारास गावालगत असलेल्या जंगलात एकटेच गेले होते.
अचानक दबा धरून बसलेला अस्वालाने त्यांच्यावर हल्ला केला.
मदतीला कुणीच नसल्याने मोठ्या प्रमाणात अस्वलाच्या हल्लात ते जखमी झाले.
गावातील एक व्यक्ती मशरूम जमा करण्यासाठी जंगलात जात असताना त्यांना रस्त्यावर एक व्यक्ती जखमी अवस्थेत असल्याचे दिसले त्यानंतर त्यांनी तात्काळ भ्रमणध्वनिने गावातील काही लोकासोबत संपर्क साधून त्यांच्या मदतीने जखमी यादवराव राऊत यांना कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तो गंभीर अवस्थेत असल्याने त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय येथे हलविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here