संतनगरीतील दुकाने तिन दिवस बंद

1239

 

सर्व दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद

अरूण बोरकर / धाबा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा तसेच कोरोना संसर्गाच्या साखळीला खंडित करण्यासाठी धाबा गावात व लगतचे असणारे गावात 13 सप्टेंबर रविवार पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात आले आहे. या बंदीला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सर्व दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेले दिसून आले. रविवार 13 सप्टेंबर पर्यंत असाच बंद कायम राहण्यासाठी सहकार्य करावे. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे असे आवाहन व्यापारी संघटनेने केले आहे.

बंदच्या काळात ग्राम पंचायत कडून स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण तसेच आरोग्य तपासणीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी घरातच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहभागी होताना दिसले. गावातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहे

सर्व किराणा, भाजी-फळे दुकाने, बाजारपेठेतील इतर दुकाने पूर्णता बंद आहेत. तसेच, सर्व पानठेले, चहा टपऱ्या दुकाने बंद आहेत.