रेगडी विकासपल्ली परिसरात होत आहे विजेचा लपंडाव

0
464

मंजूर असलेल्या 33 केव्ही उपकेंद्राचे काम त्वरित करा नागरिकांची मागणी

गडचीरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातील रेगडी,माडेआमगाव,मकेपल्ली,
पुसगुडा,पोतेपल्ली,
विकासपल्ली,गरंजी,कर्मे टोला या परिसरातील वीज मागील आठवड्या भरापासून दिवस रात्र खंडित होत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे
पाऊस नाही वारा नाही तरी सुद्धा वीज का बरं खंडित होत आहे असा प्रश्न परिसरातील नागरिकांन कडून केली जात आहे
रेगडी हे गाव परिसरातील सर्वात मोठे गाव असून या गावात शासकीय आश्रम शाळा ,पोलीस मदत केंद्र,जिल्हा परिषद शाळा,आरोग्य केंद्र,व ज्युनिअर कॉलेज,प्रगती नागरी पत संस्था अशे अनेक कार्यालय व मोठ मोठे व्यावसायिक,राईस मिल असून वारंवार वीज खंडित होत असल्याने सगळयांचे हाल बेहाल होत असल्याचे दिसून येत आहे
व सर्व परिसरातील नागरिकांना वीज खंडित होत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे
विशेष म्हणजे रेगडी या गावात 33 केव्ही उपकेंद्र पण मंजूर आहे त्याचे काम पण मागील एक वर्षा पासून होत नसल्याने परिसरातील नागरिक 33 केव्ही उपकेंद्राचे काम त्वरित करा अशी मांगणी करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here