Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात आज 59 कोरोनामुक्त तर नवीन 110 कोरोना बाधित

गडचिरोली जिल्ह्यात आज 59 कोरोनामुक्त तर नवीन 110 कोरोना बाधित

 

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

सक्रिय कोरोना बाधितांपैकी आज जिल्हयात 59 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील 22, चामोर्शी येथील 9, आरमोरी 3, सिरोंचा 4, अहेरी 3, कुरखेडा 15, धानोरा 3 व मुलचेरा 1 असे एकूण 59 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर 110 नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील वेगवेगळया ठिकाणी कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे 39 जण बाधित आढळून आले. अहेरी 3, आरमोरी 2, चामोर्शी 23 यात सर्व कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे आहेत. धानोरा 14, कोरची 1, कुरखेडा 7, मुलचेरा 3, सिरोंचा 12, वडसा 6 असे आज एकुण 110 नवीन कोरोना बाधित आढळले.
यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 295 झाली असून एकुण बाधित संख्या 1459 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 1163 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा दुदैवी मृत्यू जिल्हयाबाहेर झाला आहे.
कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयातील 50 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयातील एका 50 वर्षीय कर्मचाऱ्याचा आज सकाळी मृत्यू झाला. मृत्यूनंतर सदर कर्मचाऱ्याची एन्टीजन (RAT) कोरोना चाचणी करण्यात आली व ती सकारात्मक मिळाली. यानंतर सदर मृत कर्मचाऱ्याचे प्रशासनाकडून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अंतिम संस्कार करण्यात आले. याबाबतचे अधिक तपशील आरोग्य विभागाकडून पुढिल अहवाल तपासणीनंतर देणेत येणार आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!