Advertisements
Home Breaking News अति प्रसंग करनारा मिनी आयटीआयचा शिक्षक पोलीसांच्या ताब्यात

अति प्रसंग करनारा मिनी आयटीआयचा शिक्षक पोलीसांच्या ताब्यात

गोंडपिपरी / आकाश चौधरी

Advertisements

मिनीआयटीआय मध्ये शिवणकलेचे प्रमाणपत्र आणण्याकरिता गेलेल्या एका तरूणीवर संचालकाने दहा हजार रूपये देतो.आपण संबध प्रस्तापित करू अशी मागणी केली.तिचा विनयंभंग केला.दुस-या खोलीत असलेल्या तरूणीने आरडाओरड केल्यानंतर तिची कशीबशी सुटका झाली.गोंडपिपरी येथे काल दुपारी हा प्रकार घडला.याप्रकरणी मिनीआयटीआयच्या संचालकाविरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्या त आला आहे.
गोंडपिपरी येथे एक खाजगी मिनी आयटीआय आहे.कोेंढाणा येथील अमीत अलोणे हा मिनीआयटीआय चालवितो.यामाध्यमातून शिवणक्लास व इतर बाबींचे प्रशिक्षण दिल्या जाते.करंजी येथील दोन तरूणींनी या मिनीआयटीयात शिवणक्लाससाठी प्रवेश घेतला.परिक्षाही झाली.अन काल त्या डिप्लोमा घेण्याकरिता आयटीआय मध्ये गेल्या.दरम्यान संचालक अमीत अलोणे याने एका तरूणीला दुस-या खोलीत मासिक पाळीबाबत सविस्तर लिहीण्यासाठी सांगितले.दुसरीच्या सोबत तो अलंगट करू लागला.त्याने तिला अश्लील चित्रही दाखविले.यांनतर तिचा विनयभंग केला.तुझ्यासोबत मी लग्न करतो.तुझ्या सोबत मला संबंध ठेवायचे असे म्हटले.सोबत यासाठी दहा हजार रूपये तिच्या बॅकेच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले.आणी यासाठी अॅडव्हान्स म्हणून त्याने पाचशेच्या दोन नोटा तिच्या हातात दिल्या.पण तरूणीने नकार दिला.अन दुस-या खोलीत असलेल्या मैत्रीणीने तिला आवाज मारताच हिच संधी साधून तिने आपली सुटका केली.यानंतर दोघेही घाबरलेल्या अवस्थेत आपल्या गावाला पोहचल्या.
घरी गेल्यानंतर तरूणीने घडलेला प्रसंग आईवडिलांना सांगितला.यानंतर त्यांनी थेट गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठल.पोलीसात घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली.तरूणी हि अल्पवयीन असल्याने विनयभंग करणा-या अमीत अलोणेविरूध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याला अटक करण्यात आली आहे.प्रकरणाचा पुढील तपास गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले हे करित आहेत.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कार्यालयात हद्द-एक मर्यादा या चित्रपटाचे प्रमोशन…

चंद्रपुर: एस.के.चित्रपट निर्मित "हद्द-एक मर्यादा" हा चित्रपट येत्या 15 ऑक्टो.2022 ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात प्रदर्शित होत आहे. आज आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही...

विशाल शेंडे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार जाहीर

चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सन २०२१-२२ या कालावधीत महाविद्यालयात तसेच इतर क्षेत्रात...

उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण…विजेत्यांचा सत्कार – आ.वडेट्टीवार यांची सपत्नीक उपस्थिती

सिंदेवाही:  युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून सिंदेवाही - लोनवाही महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान घरगुती गणेशाची उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धेचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कार्यालयात हद्द-एक मर्यादा या चित्रपटाचे प्रमोशन…

चंद्रपुर: एस.के.चित्रपट निर्मित "हद्द-एक मर्यादा" हा चित्रपट येत्या 15 ऑक्टो.2022 ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात प्रदर्शित होत आहे. आज आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही...

विशाल शेंडे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार जाहीर

चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सन २०२१-२२ या कालावधीत महाविद्यालयात तसेच इतर क्षेत्रात...

उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण…विजेत्यांचा सत्कार – आ.वडेट्टीवार यांची सपत्नीक उपस्थिती

सिंदेवाही:  युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून सिंदेवाही - लोनवाही महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान घरगुती गणेशाची उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धेचे...

मोबाइलसाठी मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव…#कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का…

चंद्रपूर : वडीलांनी मोबाईल बघू दिला नाही, या कारणाने एका मुलाने अपहरणाचा बनाव केला. शहरातील एका अकरा वर्षाच्या मुलाला मोबाईलचे प्रचंड वेड. नेहमीप्रमाणे तो...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!