चार चाकी वाहन अंनखोडा नाल्यावरील पुलाखाली पाण्यात कोसळली. मात्र जीवित हानी नाही.

0
888

चामोर्शी तालुका प्रतिनिधी/ गौरव वाट

चामोर्शी कडून येत असलेली
कार अनखोडा नाल्यावरील पुलावरून खाली कोसळली व पाण्यात डुबली . मात्र जिवीत हानी झाली नाही
नागभीड येथील रहिवासी दादाजी कारूजी फुलझेले हे गाडी क्र. एम.एच ४९ ए ई २३३८ या क्रमांकाची कारने नागभीड येथून अहेरी येथे जात होती अहेरी येथे मुली व जावाईकडे भेटायला जात असताना अनखोडा नाल्याजवळ अचानक फोन आल्याने सदर व्यक्ती फोन वर बोलत असताना गाडीवरून ताबा सुटल्यावर गाडी नाल्यात कोसळली नाल्यात पाणी कमी असल्याने गाडी चालकाच्या बाजूचा अर्धा काच खुला असल्याने गाडी चालक मालक दादाजी कारूजी फुलझेले स्वतः गाडी बाहेर निघून आपल्या सोबत असलेल्या स्वतःच्या पत्नीला पाण्याखाली असलेल्या गाडीतून बाहेर काढले . स्वतःचे व पत्नीचे प्राण वाचवन्यात यश प्राप्त केले. लोकांच्या सहायाने आपल्या पत्नीला आष्टी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले आहे. सदर चालक मालक यांचा मोबाईल गाडीतच राहिला आष्टी पोलीस स्टेशन ला माहिती होताच घटनास्थळ गाठून मदत कार्य सुरू केले आहे अधिक तपास ए पी आय धर्मेंद्र मडावी पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील ए एस आय गोंगले ,हवालदार रामटेके पोलीस शिपाई राजु पंचपुल्लीवार बालाजी येलकुचीवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here