कनेरी येथे शंभर हॉर्सपॉवरचा विद्युत ट्ट्रान्सफॉर्मर मंजुर करा

693

 

आरमोरी

तालुक्यातील जोगीसाखरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कनेरी गावातील विद्युत कनेशनचे ट्रासफामर हे अत्यंत कमि हासपावरचे असल्याने बाराही महीने व पावसाच्या दिवसात वारंवार लाईन बंद होऊन कीत्येक दिवस नागरीकांना अंधारात राहण्याची वेळ येत असल्यामुळे येथिल विद्युत ट्रासफामर शंभर हासपावरचे मजुर करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी  अधिक्षक अभियंता विज वितरण कम्पनी गडचिरोली यांच्या कडे मागणी केली आहे.
जोगी साखरा गट ग्रामपंचायत अंतर्गत संपुर्ण जंगल व गाढवी नदिला लागुण असलेला कनेरी गावात बरेच वर्षापासुन नागरीकांच्या सोईसाठी गाव व कृषी पंपासाठी 25 हासपावरचे विद्युत ट्रासफामर बसविण्यात आले परंतु वाढती लोकसंख्या व जवळ पास विसच्या वरुण कृषि पंपाचे कनेष्शन मुळे विज पुरवठा बरोबर होतं नसल्याने बाराही महिने व पावसाच्या दिवसात वारंवार लाईन बंद होऊन नागरीकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांनी केली येथे शंभर हासपावरचा विद्युत जनित्र मजुर करण्यात यावा म्हणुन ग्रामपंचायत चा ठराव व निवेदने वारंवार विज वितरण कम्पनीला देऊनही अखेर कनेरी गावकऱ्यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या कडे मागणी केली असता याची दखल घेऊन घोडाम यांनी स्वता कनेरी गावाला भेट देऊन समस्या जाणल्या असता गावकऱ्यांनी विजेच्या लपडावामुळे घरेलु विद्युत उपकरणे व शेतकऱ्यांचे कृषि पंप जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असे  सांगितले यांची दखल घेऊन  तात्काळ कनेरी गावांसाठी जुने पंविस हासपावरचे विद्युत जनित्र  काढुन नविन शंभर हासपावरचा विद्युत जनित्र मजुर करण्यात यावा अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी अधिक्षक अभियंता विज वितरण कम्पनी गडचिरोली यांच्या कडे निवेदनातून केली आहे
या वेळी निलेश नैताम.रविद्र चापले. बाबुराव नैताम.रोषण नैताम.अशोक नैताम.देवानद नैताम.नामदेव नैताम आदि उपस्थित होते…