Home गडचिरोली विद्यार्थ्यांना अमानुष रित्या मारहाण प्रकरणाचा भाजपा युवा मोर्चा चामोर्शी तर्फे निषेध

विद्यार्थ्यांना अमानुष रित्या मारहाण प्रकरणाचा भाजपा युवा मोर्चा चामोर्शी तर्फे निषेध

371

 

गडचीरोली / जिल्हा संपादक प्रशांत शाहा

धुळे येथे काल मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे कोरोना संकटात परीक्षा न घेता जमा असलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे तसेच ह्यावर्षी शिक्षण शुल्क कमी करावे अशा रास्त मागण्या घेऊन गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) च्या विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या अंगरक्षकांनी त्यांच्यासमोरच अमानुष मारहाण केली होती, माणूसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेचा भाजपा युवा मोर्चा चामोर्शी तालुका तर्फे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या मार्गदर्शाखाली आज तहसीलदार संजय गंगथळे यांना एक निवेदन देऊन ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला तसेच ह्या घटनेतील दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी ह्या निवेदनातुन करण्यात आली तसेच ह्यावेळी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर तहसीलदार साहेबांशी चर्चा केली..!!
ह्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रतीक राठी , शुभम लांजेवार भाजयुमो उपध्याख व कार्यकर्ते उपस्थित होते..!!

Don`t copy text!