बिबी ग्रामपंचायत पाच हजार नागरिकांना वाटप करणार मास्क

0
124
  1. कोरपना

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बिबी ग्रामपंचायतच्या वतीने पाच हजार मास्कच्या वितरणाचा प्रारंभ आज (दि. २८) पासून करण्यात आला आहे.
बिबी गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बिबी, धामणगाव, नैतामगुडा, आसन (बु.) व गेडामगुडा येथील सर्व नागरिकांना मास्कचे वितरण करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत बिबीच्या वतीने नेहमी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतात.
यावेळी सरपंच मंगलदास गेडाम, उपसरपंच आशिष देरकर, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र अल्ली, संगीता ठाकरे, ग्रामविकास अधिकारी प्रताप ढुमणे, शेख रहीम, कर्मचारी सुनिल कुरसंगे, अनिल आत्राम, रामकिसन कुळमेथे, मारोती घोडाम आदी उपस्थित होते.

 

खेड्यापाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता ग्रामपंचायतच्या वतीने मास्कचे वितरण करण्यात येत आहे. लोकांनी नियमित मास्कचा वापर करण्याचे आवाहन करतो.
– आशिष देरकर, उपसरपंच, ग्रा.पं. बिबी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here