संपुर्ण देशभरात अति मुसळधार पावसाचा इशारा

0
158

नवी दिल्ली – देशाच्या काही भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामानशास्त्र विभागाने संपूर्ण देशभरामध्ये हवामान आणि अतिवृष्टीविषयी गंभीर इशारा दिला आहे.

हवामान विभागाने आगामी दोन-तीन दिवसांत देशात होणाऱ्या पर्जन्यवृष्टीविषयी विस्तृत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार मध्य प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये दि. 27 तारखेला आणि 28 या तारखांना तसेच छत्तीसगड राज्यांतल्या काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता आहे.

आज मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

तेलंगणा आणि पश्‍चिम मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस होईल. तसेच जम्मू आणि काश्‍मिर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर पंजाब, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम आणि मेघालय, आंध्र प्रदेशाचा किनारपट्टीचा भाग आणि तामिळनाडू, पुडुचेरी, ओडिशा या राज्यांत, काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

तर शुक्रवारी पूर्व-मध्य प्रदेशातल्या काही भागामध्ये अति जोरदार वृष्टी होण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्येही काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदिगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, अरूणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, गुजरात राज्य, कोकण आणि गोवा तसेच तेलंगणा या राज्यांमध्येही अति पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here