भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटी नेमण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश

342

 

नितेश खडसे / जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यात धान खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. बोगस ७/१२ दाखवून शेतकऱ्यांना मिळणारे धानासाठीचे अनुदान लाटण्याचा प्रकार अतिशय गंभीर असून यासंदर्भात तातडीने विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात येऊन दोषींना कठोर शासन करण्यात यावे,असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले.

यासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विश्वजित कदम तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, गृह, पणन आणि आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते