सिहांना मार्निग वाॕकला नेलं आणि त्यांच्याच हल्यात अंकल वेस्ट यांच्या मृत्यू

0
202
Advertisements

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेतील पर्यावरणवादी (South African conservationist) वेस्ट मॅथ्युसन यांचा सिंहांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दोन पांढऱ्या सिंहांनी त्यांच्यावर हल्ला केला. सिहांना फिरायला घेऊन गेल्यावर हा प्रकार घडला. वेस्ट यांच्या पत्नीने सांगितलं की, पती आणि सिहांच्या पाठीमागून मी कारने येत होते. त्यावेळी हा हल्ला झाला. तेव्हा सिहांचे लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. वेस्ट हे दक्षिण आफ्रिकेतील लिम्पोपो प्रांतात एक सफारी लॉज चालवत होते. लॉयल ट्री टॉप लॉज असं त्याचं नाव होतं.

वेस्ट यांच्यावर हल्ला करणाऱ्या सिंहिणीला दुसऱ्या गेम लॉजमध्ये नेण्यात आलं आहे.

Advertisements

पुढचा काही काळ तिच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. त्यानंतर जंगलात सोडून दिलं जाईल. सिंहिण आधी दुसऱ्या सिंहावर धावून गेली होती आणि अचानक पर्यावरणवादी वेस्ट मॅथ्यूसनकडे वळली. मॅथ्यूसनवर हल्ला केल्यानंतर तिला एका गेम लॉजमध्ये हलवलं आहे. वेस्टला अंकल वेस्ट नावाने ओळखलं जातं.

वेस्ट मॅथ्युसन सिहांसोबत मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा त्यांची पत्नी गिल पाठीमागून कारने येत होती. तेव्हा टॅनर आणि डेमी या सिंहांनी त्यांच्या डोळ्यादेखतच वेस्ट यांच्यावर हल्ला केला. जोहान्सबर्गपासून 280 किलोमीटर अंतरावर असलेल्या होएडस्प्रुट इथल्या सफारी लॉजच्या परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.

सिंहांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वेस्ट यांच्या नातेवाइकांनी ही घटना बुधवारी झाल्याचं म्हटलं आहे. वेस्ट मॅथ्यूसन यांनी सिंहांना एका लॉजमध्ये घालून केल्या जाणाऱ्या शिकारीतून वाचवलं होतं. डबाबंद शिकार असंही त्याला म्हटलं जातं. या प्रकारात शिकार करण्यासाठी सिहांना बंदी बनवून एका लॉजमध्ये ठेवण्यात येतं. वेस्ट यांच्यावर हल्ला केलेल्या सिंहिणीने 2017 मध्ये एका व्यक्तीवर हल्ला केला होता. त्याचा यामध्ये मृत्यू झाला होता.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here