जिल्हा प्रतिनिधी सतीश कुसराम:
*कूरखेडा* – तालूका मूख्यालया पासून १० कीलोमीटर तर शिवणी गावापासून पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दासखडका या नैसर्गिक धबधबा परीसराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देत परीसराचा विकास करा अशी मागणी शिवणी येथील नागरीकानी गूरूवार रोजी कूरखेडा येथे आमदार रामदास मसराम यांची भेट घेत व त्याना निवेदन देत केली आहे.
शिवणी जवळ असलेल्या डोगंरावरून पावसाळ्यात खळखळते पाणी खाली येत हा नैसर्गिक धबधबा तयार झाला आहे मागील दोन वर्षात सोशल मीडिया वरून याची माहीती सर्वत्र झाल्याने मोठ्या संख्येत विशेषता पावसाळ्यात या नैसर्गिक स्थळात आनंद लूटण्याकरीता पर्यटक येथे येत आहेत मात्र इथ पर्यंत पोहचविण्याकरीता रस्ता नाही त्यामूळे दोन कीलोमीटर अंतर जगंलवाटेने पायपीट करावी लागते तसेच सूरक्षेचे सूद्धा येथे उपाय योजणा नाही त्यामूळे पर्यटकाना इथपर्यत पोहचण्याकरीता पक्का रस्ता व इतर सोई सूविधा उपलब्ध होण्याकरीता या स्थळाला शाशनाचा वतीने पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्याकरीता शाशन स्तरावर पाठपूरावा करण्याचा मागणी करीता आमदार रामदास मसराम याना निवेदन देण्यात आले निवेदन देताना शिवणीची सरपंच मंजूळाताई मारगाये, तानाजी कूमोटी, तूकाराम मारगाये,दौलत कूमोटी,श्रीसागर गावळ, श्रीराम नैताम,मानिक कमरो, गोवर्धन सोरी व गावकरी हजर होते







