ब्युरो चीफ श्याम माशाखेत्री:
कूरखेडा:- आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा जनता दरबाराचे आज दि.२८ आगस्ट गूरूवार रोजी दूपारी १ ते सांयकाळी ६ वाजेदरम्यान येथील किसान सभागृहात आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरीकानी शाशकीय यंत्रणे कडून होणारी कामकाजातील हयगय, प्रलंबीत समस्या,अडचणी या आक्रमक पणे मांडत अधिकार्यांचा कार्यप्रणालीचे वाभाळे काढले.
यावेळी सतीनदीचे रखडलेले पूलाचे व राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम, नगरपंचायत अंतर्गत रखडलेले घरकूल बांधकाम,वनपट्टा शेतीचा सात बारा उतार्यात वारसानाचा नोंद घेण्यात होणारा विलंब, कूरखेडा येथील दारूबंदी व सार्वजनिक पाणी पूरवठा योजनेचे गढूळ पाणी, तालूक्यातील प्रलंबीत पांदन रस्त्यांचे कामे,रखडलेले व खड्डेमय रस्ते तसेच तालूक्यात यूरीया खताची टंचाई व शाशकीय दरा पेक्षा अधिक दराने होणारी विक्री,घाटी येथील रखडलेली पाणी पूरवठा योजना नवेझरी येथील शिक्षकाचा प्रश्न यासंदर्भात नागरीकानी प्रश्नाचा भडीमार करीत संबंधित अधिकार्यावर भंबेरी उडविली सांयकाळी ६ वाजेपर्यंत हा जनता दरबार सूरू होता यावेळी आमदार रामदास मसराम यानी संबंधित सर्व अधिकार्याना कामकाजात गती आणत नागरीकांचे समस्या प्राधान्य क्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश दिले याप्रसंगी तहसीलदार राजकूमार धनबाते कांग्रेस तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी माजी जि प सदस्य नंदभाऊ नरोटे माजी प स सभापती गिरीधर तितराम देसाईगंजचे माजी प स सभापती परसराम टिकले माजी उपसभापति श्रीराम दूगा माजी उपसभापति नवनाथ धाबेकर,उबाठा ता.प्रमूख आशिष काळे माजी नगराध्यक्ष आशाताई तूलावी,सागर वाढई तसेच गावागावावरून आलेले ग्रामपंचायत पदाधिकारी नागरीक विविध विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येत हजर होते.







