शिवसेना तालुका प्रमुख पप्पी पठाण यांची अशीही एक माणुसकी…

265

मुलीच्या कानाच्या शस्त्रक्रियेसाठी केली आर्थिक मदत

मुख्य संपादक प्रशांत शाहा/
चामोर्शी – चामोर्शी तालुक्यातील मूरखळा येथील विनोद खडसे यांच्या मुलीची कानाची शस्त्रक्रिया सावंगी येथील रुग्णालयात करण्याचे ठरले मात्र विनोद खडसे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सावंगी येथील रुग्णालयात नेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.

त्यांनी शिवसेना तालुका प्रमुख पप्पीभाऊ पठाण यांचे निवासस्थान गाठले व त्यांना परिस्थिती सांगितली. पप्पी भाऊ पठाण यांनी त्वरित मुलीच्या ने आणण्याचा खर्च उचलत विनोद खडसे यांना आर्थिक मदतही केली. 20 टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण या शिवसेनेच्या तत्त्वानुसार ते नेहमीच गरजू व्यक्तींना मदत करत असतात. त्याचा परिचय पुन्हा दिसून आला. त्यांनी केलेल्या मदतीबद्दल खडसे परिवार व नागरिकांनी त्यांचे आभार मानले