Homeचंद्रपूरब्रम्हपुरीकोल्हापूरची अमृता पुजारी ठरली महाराष्ट्र महिला केसरी.... विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारयांचे...

कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली महाराष्ट्र महिला केसरी…. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारयांचे हस्ते सपत्नीक सन्मान – ब्रम्हपुरी येथे महिला कुस्ती स्पर्धा

ब्रम्हपुरी: राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विजय वडेट्टीवार मित्र परिवार व तालुका कुस्तीगिर संघ ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने ब्रम्हपुरी येथे तीन दिवसीय महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली.

आयोजित स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून 600 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.आज दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना चांगलाच रंगला. यात कोल्हापूरची अमृता पुजारी हिने सामन्याच्या अंतीम क्षणी सांगली च्या प्रतीक्षा बागडी हीचा पराभव करीत महाराष्ट्र केसरीचा (दुसरा) किताबाची माळ गळ्यात घातली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी किरण विजय वडेट्टीवार यांचेसह विजेत्यांचा सपत्नीक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

याप्रसंगी प्रामुख्याने किरण ताई वडेट्टीवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, ॲड. राम मेश्राम, डॉ. नामदेव किरसान, प्राचार्य जगनाडे, ब्रम्हपुरी नगराध्यक्ष रिता उराडे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, न. प. गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ.नितीन उराडे, कृउबा सभापति प्रभाकर सेलोकर थानेशवर कायरकर, राकेश नागरे, महिला आघाडी अध्यक्षा मंगला लोनबले, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, युवक काँग्रेस चे सोनू नाकतोडे व तालुका काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी चे सर्व पदाधिकारी, कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व स्पर्धक उपस्थित होते.

बॉक्स -:
दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल भेट…

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने ब्रम्हपुरी तालुक्यांतील दीव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल चे वितरण करण्यात आले.

झालेल्या स्पर्धा व विजेत्यांची यादी

वरीष्ठ महिला
५० किलो गट
प्रथम विजेती- ज्ञानेश्वरी पायगुंडे पुणे
द्वितीय विजेती- गौरी पाटील कोल्हापूर
तृतीय विजेती- अंशिता मनोहरे नागपूर व नंदीनी साळूंके कोल्हापूर

५३ किलो गट
प्रथम विजेती- स्वाती शिंदे कोल्हापूर
द्वितीय विजेती- साक्षी इंगळे पुणे
तृतीय विजेती- मेघना सोनुले कोल्हापूर व किर्ती गुडलेकर धुळे

५५ किलो गट
प्रथम विजेती- धनश्री फंड अहमदनगर
द्वितीय विजेती- स्मिता पाटील कोल्हापूर
तृतीय विजेती-नेहा चौगुले कोल्हापूर व ऐश्वर्या सणस ठाणे

५७ किलो गट
प्रथम विजेती-तन्वी मगदुम कोल्हापूर
द्वितीय विजेती- समृद्धी निलवे मुंबई
तृतीय विजेती- तनु जाधव (ब्रम्हपुरी)चंद्रपुर व श्रुती बमनावत छत्रपती संभाजी महाराज

५९ किलो गट
प्रथम विजेती-अश्लेषा बागडे सोलापूर
द्वितीय विजेती- पुजा लोंढे सांगली
तृतीय विजेती- आर्या पवार सातारा व विशाखा चव्हाण पुणे

६२ किलो
प्रथम विजेती-वैष्णवी पाटील कल्याण
द्वितीय विजेती- अंकिता शिंदे कोल्हापूर
तृतीय विजेती-सोनिया मरक सोलापूर व किर्ती पवार पुणे

६५ किलो
प्रथम विजेती-सृष्टी भोसले कोल्हापूर
द्वितीय विजेती- श्रंखला रत्नपारखी
संभाजी नगर
तृतीय विजेती-सिध्दी कणसे सातारा व वैष्णवी कदम सांगली

६८ किलो
प्रथम विजेती-शिवांजली शिंदे सोलापूर
द्वितीय विजेती-अस्मिता पाटील मुंबई
तृतीय विजेती- श्रावणी शेळके कोल्हापूर व पल्लवी पोटेफोडे पुणे

७२ किलो
प्रथम विजेती-वेदांतिका पवार सातारा
द्वितीय विजेती-शिवानी मेटकर कोल्हापूर
तृतीय विजेती- वेदिका सातने कोल्हापूर व ऋतुजा जाधव सांगली

सब ज्युनिअर मुलींचा गट
४० किलो
प्रथम विजेती- सानिका जाधव कोल्हापूर
द्वितीय विजेती- पुर्वा परदेशी पुणे
तृतीय विजेती- कृथिका पवार पुणे व रसिका माळी सांगली

४३ किलो
प्रथम विजेती- सई कुडले पुणे
द्वितीय विजेती- ऋतुजा इंगळे कोल्हापूर
तृतीय विजेती- प्रांजल खोब्रागडे अमरावती व सानिया देसले ठाणे

४६ किलो
प्रथम विजेती-अनुष्का हाफसे सातारा
द्वितीय विजेती- प्रतिक्षा सावंत कोल्हापूर
तृतीय विजेती- मानसी खरमाटे सांगली व आयशा शेख अहमदनगर

४९ किलो
प्रथम विजेती- शिवानी कर्चे सोलापूर
द्वितीय विजेती- गौरी पाटील कोल्हापूर
तृतीय विजेती- सायली जगताप पुणे व ऋतुजा दरेकर अहमदनगर

५३ किलो
प्रथम विजेती-रुतुजा गावडे पुणे
द्वितीय विजेती-गौरी पाटील कोल्हापूर
तृतीय विजेती-हर्षदा मासाळ छत्रपती संभाजी नगर व दाली गुप्ता ठाणे

५७ किलो
प्रथम विजेती-पुजा पाटील कोल्हापूर
द्वितीय विजेती- प्रमीला बागडी सांगली
तृतीय विजेती-तनूजा सदाकळे कोल्हापूर व सोनाली शिंदे धाराशिव

६१ किलो
प्रथम विजेती- अमृता चौगुले सातारा
द्वितीय विजेती- जान्हवी गोडसे सोलापूर
तृतीय विजेती-सिध्दी पाटील कोल्हापूर व राधीका ढेरे कोल्हापूर

६५ किलो
प्रथम विजेती-अपेक्षा पाटील कोल्हापूर
द्वितीय विजेती-सावरी सातकर पुणे
तृतीय विजेती-आरती अधाने छत्रपती संभाजी नगर व सृष्टी पाटील सांगली

६९ किलो
प्रथम विजेती-तृप्ती भवर छत्रपती संभाजी नगर
द्वितीय विजेती-रुचिता पाटील मुंबई उपनगर
तृतीय विजेती-आकांक्षा शिर्के अहमदनगर व साक्षी बळे पुणे

७३ किलो
प्रथम विजेती- सिध्दी खोपडे ठाणे
द्वितीय विजेती-समृद्धी किनीकर मुंबई उपनगर
तृतीय विजेती-आर्या शिंदे अहमदनगर व प्रतिक्षा बेगडे कोल्हापूर

76 किलो वजन गट

महाराष्ट्र महिला केसरी महिला कुस्ती स्पर्धेची प्रथम विजेती- अमृता पुजारी कोल्हापूर ही ठरली. तर द्वितीय विजेती-प्रतिक्षा बागडी सांगली, तृतीय विजेती-सोनाली मंडलिक नाशिक व भाग्यश्री फंड अहमदनगर ह्या आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!