रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – ५० रक्तदात्यांचा सहभाग…

71

संपादक प्रशांत बिट्टूरवार

 

ब्रम्हपुरी  : गडचिरोली पाटबंधारे विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली व लायन्स क्लब, ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज गडचिरोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये ५० रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. राहुल मोरघडे, कार्यकारी अभियंता, गडचिरोली पाटबंधारे विभाग यांनी भूषविले. त्यांच्या सोबत संतोष वाकोडे, उपविभागीय अभियंता, तसेच लायन्स क्लब, ब्रह्मपुरी येथील पदाधिकारी, विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कोटगल बॅरेज येथील अधिकारी व कर्मचारी यांचाही उल्लेखनीय सहभाग लाभला.

 

शिबिराचे सुयोग्य नियोजन राहुल दाभाडे, शाखा अभियंता व नितीन नाईक, भांडारपाल यांनी केले. रक्तदात्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू म्हणून आकर्षक पाण्याच्या बाटल्या लायन्स क्लब, ब्रम्हपुरी च्या वतीने देण्यात आल्या. लायन्स क्लब ब्रम्हपुरीचे सचिव ला. सौ किरण झाडे व कॅबिनेट ऑफिसर ला. रामकुमार झाडे याप्रसंगी उपस्थित होते.

 

शिबिराच्या शेवटी संतोष वाकोडे, उपविभागीय अभियंता यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून रक्तदानाच्या उपक्रमाला अधिक बळ मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.