*”स्कूल” ची स्पेलिंग न आल्याने शिक्षकाची विद्यार्थ्यांस बेदम मारहाण*…

335

मांगली जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
त्या मारकुट्या शिक्षकावर कारवाई होणार

प्रतिनिधी/प्रशांत बिट्टूरवार:

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील रुई केंद्र अंतर्गत येणाऱ्या मांगली जिल्हापरिषद शाळेतील पहिलीच्या वर्गातील सात ते आठ मुला मुलींना “स्कूल” ची स्पेलिंग सांगता न आल्याने शिक्षकाने छडीने पाठीवर वर येत पर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून शिक्षकाने पालकांकडून कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून घेतल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार मांगली येथील जिल्हा परिषद ही चार शिक्षकी शाळा आहे.दिनांक 19 ऑगस्ट ला पहिल्या वर्गाच्या एक शिक्षकाने मुलांना “स्कूल” ची स्पेलिंग विचारली वर्गातील आठ ते दहा मुलांना स्कूल ची स्पेलिंग सांगता आली नाही या वर चिडून जाऊन सदर शिक्षकाने त्या चिमुकल्या मुला मुलींना पाठीवर वळ येई पर्यंत मारहाण केली.दिनांक 19 ला पीडित लहान मुले शाळा सुटल्यानंतर घरी गेली मात्र शिक्षकाचे भीती मुळे त्यांनी घडलेली घटना पालकांना सांगितली नाही.प्राप्त माहितीनुसार दुसऱ्या दिवशी दिनांक 20 ला पीडित मुलांपैकी काही मुले शाळेत गेलीच नाहीत.सायंकाळ पर्यंत काही पालकांना मुलांच्या पाठीवर मारल्याचे वळ दिसून आल्याने घटना उघडकीस आली.
सदर प्रकरणात API मनोज खडसे यांचेशी संपर्क केला असता दिनांक 20 ला काही पालक पोलिस स्टेशनला रात्री आले होते त्यांनी घटनेची माहिती दिली.फक्त सदर प्रकरणात आरोपी शिक्षकाला समझ द्या असे सांगून कोणतीही तक्रार न देता निघून गेल्याचे सांगितले. गटशिक्षणाधिकारी माणिक खूणे यांचेशी माहिती घेतली असता या बाबत आपल्याला बीडिओ यांचा फोन आला होता त्यांनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली.रुई केंद्र प्रमुख मोहनदास बोरकुटे यांचेशी संपर्क केला असता आज दिनांक 21 ला मंगली शाळेचे मुख्याध्यापक शेंडे यांचा फोन आला होता त्यांनी शिक्षकाने केलेला प्रकार सांगितलं तसेच शाळेच्या शिक्षकांना ब्रम्हपुरी पोलिसांनी पोलिस स्टेशनला बोलावल्याची माहिती दिली.वृत्त लीहे पर्यंत सदर प्रकरणात अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आली नसल्याची माहिती आहे.

बॉक्स :- सदर प्रकरण उघडकीस आल्या ने आता अंगलट येऊन वाढू नये या करता आरोपी शिक्षकाने पूर्ण प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.पीडित मुलांचे पालकांकडून कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून घेतल्याचे समजते .अल्पवयीन बालकांना अमानुष मारहाण होऊन सुधा अद्याप या प्रकरणात शिक्षण विभाग किंवा पोलिस विभाग अद्याप कोणतीच कारवाई न करता फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. सदर प्रकरणात पीडित मुलांच्या पालकांनी सुद्धा या प्रकरणात कोणतीच तक्रार न केल्याने अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत.’त्या’ शिक्षकावर उचीत कारवाई होणार

बाँक्स
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी आश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या आदेशानुसार, गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे हे सदर प्रकरणाची प्रत्यक्ष सखोल चौकशी करणार असून तसा अहवाल आश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. त्यानंतर सदर शिक्षकावर उचीत कारवाई होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.