Homeचंद्रपूरमतदान टक्का वाढविण्यासाठी मतदार नोंदणीचे आवाहन...विकलांग सेवा संस्थेचा पुढाकार

मतदान टक्का वाढविण्यासाठी मतदार नोंदणीचे आवाहन…विकलांग सेवा संस्थेचा पुढाकार

चंद्रपूर’ ज्यांचे वय 18 वर्ष झाले त्या तरुण तरुणीनी आपले वोटिंग कार्डसाठी तहसील कार्यालय व निवडणूक आयोगाच्या आवाहनाला सहकार्य रुपी प्रतिसाद देऊन वोटिंग कार्ड काढावे तसेच आपल्या परीक्षेत्रात होणाऱ्या निवडणुकात मतदान अग्रक्रमाने करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन व माहिती पत्रक विकलांग सेवा संस्थेद्वारा तुकूम परिसरात वितरण करण्यात आली.

सोबतच समृद्ध लोकशाही, जन व राष्ट्रसेवेकरीता सुयोग्य उमेदवार ह्यांना कोणत्याही आमिष व प्रलोभनाशिवाय निकोप मतदान करुन देशसेवा करावी. या आशयाचे १००० माहिती पत्रके वितरण करून जनतेला आवाहन करण्यात आले.

यासाठी देवराव कोंडेकर, प्रसाद पान्हेरकर, पुजा चहारे, सीमा दुपारे, राजश्री शिंदे, नितीन राव, शिवानी बोबडे ह्यांनी सहकार्य केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!