Homeनागपूरमहापारेषण तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे थाटात उद्घाटन

महापारेषण तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे थाटात उद्घाटन

नागपूर:

महापारेषण, वाय फोर डि फौंडेशन व सीर भारत फौंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

विदर्भातील 19 गावांत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

महापारेषण, महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण मालकीची आणि महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वीज पारेषण कंपनी आहे. ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पुनर्रचनेनंतर महापारेषण हि कंपनी २००५ मध्ये अस्तित्वात आली. महाराष्ट्र राज्याच्या अखंडित विद्युत पारेषण करण्याचे काम लोकाभिमुख पद्धतीने करण्याचा नावलौकिक या कंपनीने मिळवला आहे. सामाजिक ऋण परतीच्या उद्देशाने आणि व्यवसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत महापारेषण नागपूर, अमरावती व चंद्रपूर विभागातील विविध १९ गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करत आहे. या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ नागपूर येथे पार पडला. ग्रामीण भागात मोफत सर्वांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावीत व वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसलेल्या भागात ही शिबिरे उभारून रुग्णांना लांबचा प्रवास न करता उपचार आणि मोफत वैद्यकीय सेवा मिळूवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्या अंतर्गत या शिबारामध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत विविध तपासण्या, मोफत औषध वाटप व आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली.

नागपूर येथे दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी या उपक्रमाचा समारंभ करून प्रथम शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये दीडशे पेक्षा अधिक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून या सेवेचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये विविध सामान्य आरोग्य तपासणी सोबत मोतीबिंदू तपासणी, रक्तदाब तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, शुगर इत्यादी तपासण्या करून त्यावर योग्य औषोधोपचार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. अविनाश गावंडे (वैद्यकीय अधिक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, नागपूर) हे उपस्थित होते. तर, प्रमुख अतिथी म्हणून श्री. सतीश अने (मुख्य अभियंता, महापारेषण, नागपूर), श्री. राजन जोशी (अधिक्षक अभियंता, महापारेषण, नागपूर), महापारेषणचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) नागपूर विभाग श्री. प्रवीण पिल्लेवान साहेब, श्री. प्रवीण दामके (अधिक्षक अभियंता (स्थापत्य) महापारेषण, नागपूर), तसेच डॉ. नितेश खोंडे (संचालक पारिजातक आयुर्वेद प्रायव्हेट ली.), सौ. वैशाली चोपडे (संचालक, साकार फाऊंडेशन) आणि डॉ. शरयू तायवाडे (प्राचार्य, तायवाडे महाविद्यालय नागपूर) हे उपस्थित होते.

महापारेषण तर्फे श्री. दिनेश हेडाऊ (अति. कार्यकारी अभियंता (स्थापत्य)) व श्री. प्रतिक बोरकर (उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य) उपविभाग क्रमांक १ नागपूर) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ईशा रामटेके, प्रास्ताविक श्री. श्याम भोजने व आभार प्रदर्शन श्री. दर्शन तळहांडे यांनी केले. तसेच डॉ. ऋषभ झुनगरे व डॉ. श्रुनय कापसे यांचे आयोजनात विशेष सहकार्य लाभले व या सर्व शिबिराच्या नियोजनाची जबाबदारी सीर भारत फौंडेशन तर्फे डॉ. सुवर्णा पाटील, व श्री. शुभम भांगे यांनी पार पाडली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!