रिपब्लिकन पक्ष खोरीपा तर्फे आयोजित जनसमस्या निवारणाचे पहिले शिबिर संपन्न…

103

संपादक प्रशांत बिट्टूरवार

ब्रम्हपुरी : – रिपब्लिकन पक्षांने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलने केलीत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे यांनी भूमिहीनांचा सत्याग्रह, अतिक्रमित शेतकऱ्यांना कायम रुपी पट्टे,झोपडपट्टी धारकाना कायम रुपी पट्टे मिळ इवे यासाठी सतत रस्त्यावर उतरून आंदोलने केलीत .त्याच्या कार्याची प्रेरणा घेऊन बॅरिस्ट राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त रियाब्लिकन पक्ष खोरीपा ब्रम्हपुरी तर्फे” समस्या तुमच्या पुढाकार आमचा” हे घोषवाक्य घेऊन जन समस्या निवारण शिबिराचे आयोजन केले. पक्षा तर्फे हे पहिलेच जन समस्या निवारण शिबिर असून यापुढे पुढील दोन रविवारी दोन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
पहिल्या जन समस्या निवारण शिबिराचे उद्घाटक रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा साप्ताहिक पवन पर्व चे संपादन जीवन बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.मिलिंद रंगारी नेते रिपब्लिकन पक्ष खोरीपा ,गोपाळराव खोब्रागडे जेष्ठ नेते खोरीपा, प्रा.प्रशांत डांगे शहर अध्यक्ष. खोरीपा ब्रम्हपुरी हे होते.
या शिबिरात तालुक्यातील अनेक गावातील व शहरातील अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवून समस्यांचे निवेदन देऊन समस्या मांडल्या. पहिल्याच शिबिरात एकूण ३० ते ४० नागरिकांनी समस्या मांडल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर समस्यांचे निराकरण व पाठपुरावा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी संबंधित कार्यालय गाठून रिपब्लिकन स्टाईल ने प्रयत्न करणार असे प्रतिपादन प्रशांत डांगे यांनी केले.
या शिबिराचे उत्कृष्ट सूत्रसंचलन पदमाकर रामटेके तर आभार प्रदर्शन नरेश रामटेके यांनी केले.