Homeचंद्रपूरसावलीकॅन्सर तपासणी हॉस्पिटलला सावली तालुक्यातील व्याहाड बुज केंद्रावर उत्स्पुर्त प्रतिसाद...

कॅन्सर तपासणी हॉस्पिटलला सावली तालुक्यातील व्याहाड बुज केंद्रावर उत्स्पुर्त प्रतिसाद…

सावली(ता.प्र):- आज सावली तालुकातील व्याहाड बूज. येथे ग्राम काँग्रेस कमिटीतर्फे कॅन्सर तपासणी हॉस्पिटलचे सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीनजी गोहने, माजी सरपंच सौ.वंदना गुरनुले,माजी सरपंच मा.पितांबर वासेकर यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.ही कॅन्सर तपासणी हॉस्पिटल गाडी ६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर हा पहिला टप्पा सावली तालुक्यातील नागरिकासाठी उपलब्ध असणार आहे.महाराष्ट्रातील ग्रामीण,आदिवासी आणि शहरी झोपडपट्टी वस्तीत राहणारे उपेक्षित आणि वंचित कुटुंब जे आर्थिक स्थितीमुळे कर्करोग तपासणी करू शकत नाही अश्या कुटुंबांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल. उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे.

वाढत्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी तसेच वेळेपूर्वीच कर्करोगाचे निदान व्हावे यासाठी विरोधी पक्षनेते व माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी अडीच कोटी रूपये खर्च करून ‘कर्करोग निदान’ करणारी रूग्णवाहिका जनसेवा हीच ईश्वर सेवा माणून समस्त जनतेला १५ जून २०२३ ला विशेष प्रयत्नातून जनतेस समर्पित केली.राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग चंद्रपूरात राबविण्यात येत आहे. अमेरिकेतील संस्थेशी करार करण्यात आला असून तज्ञ डॉक्टराचा चमू तपासणी करणार आहे. आज व्याहाड बुज येथे तब्बल २२४ नागरिकांनी कॅन्सरची तपासणी केली असून डॉक्टरांनी १० रुग्णांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल, नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर केले आहे. ह्या रूग्णवाहिकेमुळे कर्करोगाचे वेळीच निदान होवून रूग्णांला वेळीच उपचार उपलब्ध होणार आहे

कॅन्सर तपासणी शिबिराच्या दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी व्याहाड बुज येथील उदघाट्नाला सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,माजी सभापति पं.स.सावली मा.राकेश पाटील गड्डमवार ,सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कारडे ,व्याहाड बुजचे माजी सरपंच मा.पितांबर वासेकर,माजी सरपंच सौ.वंदनाताई गुरनुले, व्याहाड बूज.महिला काँग्रेस अध्यक्ष सौ.अर्चना संगिडवार , ग्रा.पं.सदस्य व्याहाड बुज मा.सुनील बोमनवार, सौ. रुपाली करकाडे, सौ.संगीता जेंगठे,तसेच मा.अनिल गुरनुले,मा.मेहबूब खान पठाण,मा.दीपक गद्देवार ,मा.अनिल पाल,मा.चेतन मोटघरे,मा. संजय चांदेकर,मा.रुमाजी कोहळे,मा.जयंत सांगिडवार ,मा.कवडू ठाकूर, बंडू चिप्पावार,मा.डोमाजी शेंडे, काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम ,मा.जगदीश वासेकर आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून आज असंख्य कॅन्सरग्रस्त रुग्णांना वेळेआधी उपचार करून त्यांचा जीव वाचवला जाऊ शकतो,मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा माणून त्यांचे अविरत कार्य ही अभिनंदनीय बाब असून मी समस्त सावली तालुकावासीय जनतेकडून त्यांचे आभार मानतो
-मा.नितीन गोहने,
अध्यक्ष सावली तालुका काँग्रेस कमिटी

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!