सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर करा :शेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष खुशाल लोडे यांची मागणी…

193

सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर करा :शेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष खुशाल लोडे यांची मागणी

संपादक प्रशांत बिट्टूरवार

सावली: सावली तालुक्यात माहे ऑगस्ट २०२५ ते सप्टेंबर २०२५ महिन्यात सततच्या पडणा-या पावसाने धान, कापूस, भाजीपाला, तूर, तिळ पिकांना मोठ्या प्रमाणात रोज पडणाऱ्या पावसाचा फटका बसत असून सततच्या पावसाने पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव होऊन पिक धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अशी माहिती शेतकरी विविध सेवा सहकारी संस्था चे अध्यक्ष खुशाल लोडे यांनी निवेदना द्वारे शासनाला केली आहे.

आगस्ट ते सप्टेंबर महिन्यात सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण या आसमानी संकटात सापडेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमात नुकसान होत आहे. पिकांना औषध फवारणी, रासायनीक खत रोजच्या पडणाऱ्या पावसाने फवारणी विना वंचित राहत आहे. सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना यांना एका निवेदनातून शेतकऱ्यांसह शेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे.