प्रतिनिधी गौरव मोहबे
सावली:
भारत शिक्षण मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली येथे अँटी-रॅगिंग जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन सावली येथील पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पुल्लुरवार तसेच बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.धनंजय अंबटकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.चंद्रमौली होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना रॅगिंग हा समाजातील एक गंभीर गुन्हा असून त्याचे उच्च शिक्षण संस्थांमध्ये अजिबात स्थान नाही, असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक अँटी-रॅगिंग सेलच्या समन्वयक डॉ.रागिनी सी.पाटील (रसायनशास्त्र विभाग) यांनी केले. त्यांनी रॅगिंगविरोधी कायदे, शिक्षा व विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पुल्लुरवार यांनी कायदेशीर तरतुदींचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना रॅगिंगसारख्या गुन्ह्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तर ॲड.धनंजय अंबटकर यांनी विद्यार्थ्यांच्या अधिकार व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.अशिष शेंडे व आभार प्रदर्शन डॉ.किरण बोरकर यांनी केले होते.या कार्यशाळेला प्रा.प्रशांत वासाडे, प्रा देवीलाल वताखेरे, डॉ.रामचंद्र वासेकर, डॉ.संदिप देशमुख, डॉ.सचिन चौधरी इत्यादी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.