Advertisements
Home चंद्रपूर सावली सावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा... शासन नोटीसाचे पडसाद -...

सावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…

सावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाल्याने अखेर अतिक्रमणं धारकांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,काँग्रेस नेते, तथा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांचे कडे आपली व्यथा मांडली.

Advertisements

अखेर शासनाच्या या अडेलतट्टू धोरणाविरोधात माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांचे नेतृत्वात सावली काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी प्रामुख्याने राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार , काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जि.प. सभापती दिनेश चीटनुरवार , नगराध्यक्षा लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदिप पुण्यापवर, काँग्रेस शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, काँग्रेस महीला तालुका अध्यक्ष उषा भोयर, माजी तालुका अध्यक्ष राजेश सिद्धम, माजी प. स. सभापति विजय कोरवार, तसेच नगरपंचायत सावलीचे सर्व सभापति, नगरसेवक, नगरसेविका, सर्व सेल पदाधिकारी व बहूसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन पर बोलतांना माजी मंत्री आ. वडेट्टीवार म्हणाले की, रक्ताचे पाणी करून, पोटाला चिमटा घेत पाई पाई जोडून डोक्यावर छत उभरणाऱ्यांच्या जीवावर हे सरकार उठले आहे. महागाई, बेरोजगारी, असे ज्वलंत प्रश्न उपस्थित असताना आता गरिबांच्या घरावर डोळा ठेवणाऱ्या शिंदे – भाजप सरकार म्हणजे गरिबांचे कर्दनकाळ ठरणारे सरकार असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.

सोबतच ग्रामीण भागांत सुरू असलेल्या वाघ हल्ल्याच्या घटनांचा निषेध करीत वन प्रशासनाचे वाभाडे काढले. तसेच जिल्हा बँक नौकर भरती वर स्थगिती आणणारे स्थानीक पालकमंत्र्यांचा नाव न घेता चांगलाच समाचार घेतला. यानंतर मंचावरील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन काँग्रेसचे सावली तालुकाध्यक्ष नितीन गोहने यांनी तर आभार विजय कोरेवार यांनी मांडलेस्थानिक जुन्या नगरपंचायत जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसीलच्या दिशेने मोर्चा मार्गक्रमण झाला. तहसील कचेरीवर धडकलेल्या मोर्चामधील शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

आ. वडेट्टीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार…शहर काँग्रेस सावलीचा उपक्रम

सावली: गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष निष्ठा जोपासत तन-मन - धनाने काम करणाऱ्या एकनिष्ठ काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते,...

सावली तालुक्यातील धान, कापूस भाजीपाला पिक धोक्यात…

सावली: तालुक्यातील करोली, गेवरा खुर्द, गेवरा बूज, कसरगाव, विहीरगाव, बोरमाळ, चिखली, डोंगरगाव, निफंद्रा, अंतरगाव, निमगाव, व्याहाड खुर्द परिसरातील दाबगाव, थेरगाव, बेलगाव, चीचबोडी, मोखाळा, व्याहाद...

मेहा-बारसागड, मंगरमेंढा-निफन्द्रा  चौपदरीकरण मार्गावर गतिरोधक व रिफ्लेटर ची मागणी

सावली:- सुसाट वेगांना आवर घालण्यासाठी  रस्त्यावर गतिरोधकाची नितांत आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेतांना गतिरोधक असणे गरजेचे आहे. गतिरोधक हे अपघाताला रोखण्याचे माध्यम आहे.त्यामुळे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अभिनंदन! पुजा डोंगेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय वूशू स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत...

गोंडवाना विद्यापीठ सभागृहाच्या “डीडोळकर’ नामकरणाला स्थगिती

: माजी मंत्री वडेट्टीवारांच्या पत्राची गंभीर दखल गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.दत्ता डिडोळकर नाव देउन आदिवासी समाजातील थोर हुतात्मे तथा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा ठराव...

महिलांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन सत्याच्या बाजूने उभे व्हा : नम्रता ठेमस्कर

घुग्घूस : येथील तुकडोजी नगर वॉर्ड क्रं 06 येथे सौ. पदमा राजूरेड्डी यांच्या वतीने हळदी - कुंकू व वाण वाटप कार्यक्रम 28 जानेवारी रोजी...

व्यसनाधीन मद्यासक्ताच्या कुंटुबियांना आनंद व सुखाचे जीवन मिळावे यासाठी अँलअँनाॅन परिवार समुह करीत असलेले प्रयत्न समाजासाठी भूषणावह… -प्रा.शाम धोपटे

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा संपादक) चंद्रपूर- अँलअँनाॅन परिवार समुह या आंतरराष्ट्रीय संगतीचा भाग असलेल्या "सुप्रभात अँलअँनाॅन परिवार समुह चंद्रपूर येथे स्थापन होऊन चार वर्ष पूर्ण...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!