Homeगडचिरोलीनक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला स्फोटक साहित्य हस्तगत

नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला स्फोटक साहित्य हस्तगत

गडचिरोली:- नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात.

अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांचा वापर नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो.

उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें मालेवाडा हद्दीमध्ये मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहचवून, मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना काल (मंगळवार) दुपारी १२ वाजता एका संशयीत ठिकाणी लपवुन ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधून काढण्यात जवानांना यश आले.

यावेळी २ कुकर , २ नग क्लेमोर, १ नग पिस्तुल, २ नग वायर बंडल व पाणी साठवण्याचा १ जर्मन गंज इत्यादी नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले. घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यात स्फोटकांनी भरलेले २ कुकर व २ क्लेमोर हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले. तर इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. गडचिरोली पोलीस दलाकडून पुढील कारवाई सुरु आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक(अभियान) सोमय मुंडे सा. मा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक(अहेरी) अनुज तारे सा., यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाच्या जवानांचे पोलीस अधीक्षक सा, यांनी कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगितले असून, नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!