Home Breaking News बिग ब्रेकिंग: चंद्रपुर जिल्हाचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची बदली… नवीन जिल्हाधिकारी पदी...

बिग ब्रेकिंग: चंद्रपुर जिल्हाचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची बदली… नवीन जिल्हाधिकारी पदी विनय गौडा

1480

-सुरज दहागावकर (कार्यकारी संपादक)

चंद्रपुर: राज्याच्या प्रशासनात पुन्हा एकदा फेरबदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने तडकाफडकी २० सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या केल्या आहेत. यामध्ये चंद्रपुर जिल्हाचे विद्यमान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची नागपूरच्या अतिरिक्त पालिका आयुक्तपदी बदली झाली तर सातारा जिल्हा परिषद सीईओ असलेले आयएएस विनय गौडा यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

2015 च्या आयएएसच्या बॅचचे अधिकारी असलेले विनय गौडा यांची प्रशासकीय अधिकारी सेवेची सुरवात नंदूरबारला सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांची नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. नंतर त्यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आणि आज त्यांची नियुक्ती चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली.

 

Don`t copy text!