वंचित बहुजन आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश

569

ब्रम्हपुरी :- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्षच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो ही भावना नागरिकांमध्ये आहे. काॅंग्रेसचे नेते, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून सावली तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

ब्रम्हपुरी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये सावली तालुका वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष तथा घोडेवाही ग्रामपंचायतीचे उपसरपंच चेतन रामटेके, बंडुजी मेश्राम, ग्रा.पं. सदस्य विजय मेश्राम, भाजपा कार्यकर्ता अमोल चौधरी, हरदास कातलवार, बाळकृष्ण कन्नाके यांनी प्रवेश केला आहे.
यावेळी सावली तालुक्यातील किशोर घोटेकर, सत्यवान दिवटे यांसह अन्य काॅंग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.